ब्रेकिंग
*गोंदेगाव येथे वीज कोसळून मेंढपाळाचा मृत्यू
0
1
5
1
2
0
- शरद लोहकरे, लासलगाव
गोंदेगाव (ता.निफाड) येथे आज (दि.०४) दुपारी वादळवाऱ्यासोबत पाऊस झाला. यावेळी शेतात कडेला उभ्या असलेल्या मेंढपाळावर वीज पडल्याची घटना घडली. बापू अशोक वैद्य (वय ३२, रा. ममदापूर, ता.येवला) असे या मेंढपाळाचे नाव आहे.
फेब्रुवारी पासून ते आपल्या बहिणीकडे गोंदेगाव येथे मेंढ्यांसह राहत होते. परिसरात मेंढ्या चारून उन्हाळा त्यांनी पार केला होता. दोन दिवसांत ते आपल्याकडे गावाकडे परतणार होते; त्यापूर्वीच वैद्य यांच्यावर काळाने घाला घातला.
वीज कोसळल्यानंतर त्यांना तातडीने लासलगाव ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी तपासले असता वैद्य यांना मृत घोषित करण्यात आले. शवविच्छेदनासाठी मृतदेह निफाड उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला होता. स.पो.निरीक्षक भास्कर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बी.बी.कांदळकर तपास करत आहेत.
0
1
5
1
2
0