कृषीवार्ताब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसामाजिक
लासलगाव बाह्य वळण रस्त्याच्या कामाला तात्काळ होणार सुरुवात
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या सुचनेनंतर प्रांतअधिकारी आणि शेतकरी यांच्यात झालेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय

0
3
2
1
2
3
लासलगाव बाह्य वळण रस्त्याच्या कामाला तात्काळ होणार सुरुवात…
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या सुचनेनंतर प्रांतअधिकारी आणि शेतकरी यांच्यात झालेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय
येवला,निफाड,लासलगाव,दि.७ मे:- लासलगाव शहरातील बाह्यवळण रस्त्याच्या कामाला तात्काळ सुरुवात करण्याच्या सूचना प्रांतअधिकारी शशिकांत मरुंगळे यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या आहे. लासलगाव बाह्य वळण रस्त्याचा प्रश्न मार्गी लागून वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या सुचनेनुसार आज शासकीय विश्राम गृह,लासलगाव येथे लासलगाव बाह्यवळण रस्त्याच्या जमीन भूसंपादन संदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी प्रांतअधिकारी शशिकांत मंगरूळे, तहसीलदार विशाल नाईकवाडे,बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रकाश घोडे, शाखा अभियंता गणेश चौधरी, स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे यांच्यासह लासलगाव, टाकळी पिंपळगाव नजीक येथील सर्कल, तलाठी व शेतकरी बांधव उपस्थित होते.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून लासलगाव बाह्य वळण रस्त्याचे काम सुरु करण्यात आले आहे. या बाह्यवळण रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलाचे काम देखील पूर्ण झाले आहे. मात्र काही शेतकरी बांधवांचे भूसंपादन राहिल्याने रस्त्याचे काम रखडले होते. याबाबत शेतकरी बांधवांशी चर्चा करून प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी प्रांतअधिकाऱ्यांना केल्या होत्या. त्यानुसार आज प्रांतअधिकारी शशिकांत मंगरूळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी बाधित शेतकरी बांधवांशी सकारात्मक चर्चा होऊन तात्काळ काम करण्याच्या सूचना प्रांतअधिकारी शशिकांत मंगरूळे यांनी सबंधित अधिकारी व ठेकेदारांना दिल्या आहे.
0
3
2
1
2
3