
डॉ.बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनचा रोहिणी पराडकर यांना मिळाला महाराष्ट्र साहित्यरत्न पुरस्कार
नांदगाव-प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल):-
सुप्रसिद्ध साहित्यिका सौ. रोहिणी अमोल पराडकर यांना त्यांच्या साहित्यिक कार्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन चा महाराष्ट्र साहित्य रत्न घाटकोपर मुंबई येथील शहीद स्मारक सभागृह रमाबाई आंबेडकर नगर येथे प्रसिद्ध अभिनेत्री व नाट्य कलाकार मा. रंजीता पाटील यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
सौ. रोहिणी अमोल पराडकर या कोल्हापूर महिला जिल्हाध्यक्ष या पदावर कार्यरत असून सामाजिक कार्यात सहभागी होऊन मोठे योगदान दिले. त्यांच्या बाल कविता संग्रहाला तीन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्या अनेक पदावर कार्यरत आहेत.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन च्या महाराष्ट्र साहित्य रत्न पुरस्कार कार्यक्रमाच्या वेळी अभिनेते विजय पाटकर, ऍडवोकेट अजय तापकीर, मा. दिगंबर कोळी, मा. उत्तमराव तरकसे,मा. आशिष सातपुते, मा. महेश वावले,मा. सुरेश बने आदी उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनचे संस्थापक आयुष्यमान सुधीर कांबळे व त्यांची सर्व सहकारी आणि पदाधिकारी यांनी सदर कार्यक्रमाचे नियोजन उत्तम प्रकारे पार पाडले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्यातील साहित्यिक व कवी मोठ्या संख्येने उपस्थित होते.