ब्रेकिंग
१६३ कोटींच्या निधीतून येसगाव पाणीपुरवठा योजना मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात
0
4
2
9
5
7
राष्ट्रवादी, भाजपची हमी, येवलेकरांना रोज मिळणार शुद्ध पाणी
१६३ कोटींच्या निधीतून येसगाव पाणीपुरवठा योजना मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात
२०५६ पर्यंत येवल्याचा पाणी प्रश्न निकाली
येवला, दि.२९ नोव्हेंबर :- येवला शहराला लवकरच दररोज शुद्ध पाणी पुरवठा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप महायुतीने येवलावासियांना तशी हमी दिली आहे. १६३ कोटी रुपयांच्या निधीतून येसगाव पाणी पुरवठा योजना प्रस्तावित केली आहे. या पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात आहे. योजनेला राज्य तांत्रिक समितीची मंजुरी मिळताच योजनेचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे २०५६ पर्यंत येवलेकरांचा पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे.
येवला शहराची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नव्याने निर्माण झालेल्या नागरी वस्त्यांमुळे सध्याच्या पाणी पुरवठा योजनेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. पालखेड डावा कालव्यावरील साठवण तलाव आणि जल शुद्धीकरण केंद्राची क्षमता कमी पडत आहे. त्यामुळेच शहरात सध्या ३ ते ५ दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. शहरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत येसगाव उद्भवावरून नवीन पाणी पुरवठा योजना प्रस्तावित केली आहे.
वाढीव पाणी आरक्षण मंजूर
२०५६ या वर्षापर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून ही योजना साकारली जाणार आहे. या योजनेमुळे येवलेकरांना दररोज पुरेसे आणि स्वच्छ पाणी उपलब्ध होणार आहे. जलसंपदा विभागाने १५ ऑक्टोबर २०२४ रोजी गोदावरी डावा कालव्यामधून येसगाव (ता. कोपरगाव) येथून वाढीव पाणी आरक्षण सुद्धा मंजूर केले आहे.हे पाणी येऊ नये यासाठी काही राजकीय मंडळींनी खोडा घातला. राजकीय हस्तक्षेपामुळे प्रलंबित असलेली ही योजना आता मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे.
– छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री
राजकीय हस्तक्षेपामुळे विलंब
१६३ कोटी ४२ लाख ३३ हजार २३६ रूपयांच्या या योजनेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्यांनी ०५ सप्टेंबर २०२४ रोजी तांत्रिक मान्यता सुद्धा दिली आहे. त्यामुळे हा प्रस्ताव आता राज्य तांत्रिक समितीच्या मंजुरीसाठी सादर झाला आहे.
– समीर भुजबळ, माजी खासदार
अशी आहे योजना
येवला नगरपालिकेची मालकी असलेल्या ३.५५ हेक्टर जागेत ३०० दक्षलक्ष लीटर क्षमतेचा आरसीसी साठवण तलाव बांधण्यात येईल. त्यात गोदावरी कालव्यामधून जलवाहिनीद्वारे पाणी आणले जाईल. ६०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीद्वारे हे पाणी जलशुध्दीकरण केंद्रात येईल. नूतनीकरण केलेल्या या केंद्रामध्ये पाणी शुद्ध होईल. या केंद्रातून पंपिंग मशिनरीद्वारे उर्ध्ववाहिनीमधून उंच जलकुंभात पाणी आणण्याचे नियोजन आहे. नववसाहतींसह शहराच्या सर्वच भागात दररोज पुरेसे पाणी पुरवण्याचे निश्चित आहे.
योजनेची वैशिष्ट्ये
– येसगाव साठवण तलाव क्षमता – ३०० दशलक्ष लिटर
– उपसा विहीर व पाणी दाबनलिका (येसगाव ते येवला) – १२.८२ किमी
– जलशुद्धीकरण केंद्र – ७ दशलक्ष लिटर
– शुद्ध जलवाहिनी – ४.३९ किलोमीटर
– उंच साठवण टाक्या – एकूण ३ (तहसीलरोड – १२.६० लक्ष लीटर, विंचूररोड –
६.७० लक्ष लिटर, बदापूररोड–१.९० लक्ष लिटर)
– वितरण व्यवस्था – ९७.१६ किलोमीटर
– नादुरुस्त जलवाहिन्या बदलल्या जाणार
– पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेत सुधारणा
– सौर ऊर्जेवरील प्रकल्पअसा होईल दैनंदिन पाणी पुरवठा
२०२८ पर्यंत – १३.६२० दशलक्षलिटर
२०४३ पर्यंत – १६.७१० दशलक्ष लिटर
२०५८ पर्यंत – २०.३९० दशलक्ष लिटर
0
4
2
9
5
7


