‘ओपन-हार्ट’ ला पर्यायी ‘कीहोल बायपास सर्जरी’ ची शतकपूर्ती
प्रतिनिधी : अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलने 100+ यशस्वी कीहोल बायपास शस्त्रक्रिया केल्या आहेत ज्याला कीहोल हार्ट सर्जरी किंवा मिनिमली इनव्हेसिव्ह कार्डियाक सर्जरी (MICS) असेही म्हणतात, ही एक प्रकारची हृदय शस्त्रक्रिया आहे जी पारंपारिक ओपन-हार्ट शस्त्रक्रियेऐवजी छातीत लहान चीरांद्वारे केली जाते . या प्रकारची शस्त्रक्रिया पारंपारिक शस्त्रक्रियेपेक्षा वेगळी तर आहेच परंतु यामुळे रुग्णाला अनेक फायदे होतात ,ज्यामध्ये कुठलेही हाड फ्रॅक्चर न होणे, शस्त्रक्रिये नंतर शरीरावर कोणताही व्रण न दिसणे , हॉस्पिटलमध्ये कमी काळ आणि कमी कालावधीत बरे होणे समाविष्ट आहे.
डॉ. प्रणव माळी हृदय शस्त्रक्रिया तज्ञ म्हणाले कि , कीहोल हार्ट सर्जरी मध्ये कुठलेही हाड फ्रॅक्चर न करता किंवा पूर्ण छाती न उघडता दोन फासळ्यांमधून अगदी लहान चिर देऊन दुर्बिणीच्या साह्याने केली आहे. हि शस्त्रक्रिया अति प्रगत समजल्या जाणाऱ्या ऍनेस्थेशिया टेक्निक, रिजनल ऍनेस्थेशिया तसेच विशेष उपकरणांच्या मदती ने केली जाते. या पद्धतीने शस्त्रक्रियेमुळे कोरोनरी धमनी मधील अडथळे यशस्वीपणे दूर करण्यात आणि त्यांच्या हृदयात रक्त प्रवाह पूर्ववत करण्यासाठी बायपास ग्राफ्ट टाकण्यात येतात. या संपूर्ण प्रक्रियेला सुमारे तीन ते चार तास लागतात. या पद्धतीच्या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला वेदनारहित शस्त्रक्रियेचा अनुभव घेता येतो. या पद्धतीने एक पासून 4 ते 5 ब्लॉक्स ची बायपास, हृदयातील छिद्र एक किव्वा दोन वाल्व बदलणे ई. हृदय शस्त्रक्रिया करणे शक्य आहे. ही शस्त्रक्रिया फक्त मोठ्या व्यक्तीसाठी मर्यादित नसून लहान मुलांमध्ये सुद्धा करता येते.
———–
अशोका मेडीकव्हर हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांकडून एकाच छताखाली योग्य ते निदान व उपचार केले जातात. ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया किंवा हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन औषधोपचारांची गरज असेल त्यांच्यासाठी तज्ञ डॉक्टरांच्या आणि उच्च शिक्षित वैद्यकीय स्टाफ च्या देखरेखेखाली उपचार केले जातात. आधुनिक सुखसोयी आणि तंत्रज्ञान यांचा जोड असलेले अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल हे रुग्णांसाठी सर्वसमावेशक पर्याय म्हणून काम करत आहे
– डॉ सुशील पारख, मेडिकल डायरेक्टर -अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक