गुन्हेगारीसामाजिक
विंचूर येथे बनावट विदेशी दारूचा अड्डा उदध्वस्त

0
4
2
9
5
7
विंचूर येवला रोडवर एका बंगल्यात बनावट विदेशी दारूपासून दारू निर्मितीचा कारखाना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने उदध्वस्त केला. शुक्रवार दिनांक 16 रोजी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली असून सुमारे तीन लाख रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले असून तिघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदकुमार दत्तात्रय गायकवाड (वय 62 राहणार शाकंभरी बंगला गंधर्व नगरी नाशिक रोड हल्ली मुक्काम जय भवानी बंगला साई नगर कॉलनी विंचूर तालुका निफाड ), श्रवण गनोर पासवान (56, रा कसीयोगा, ता. राजनगर, जि. मधोबानी, बिहार हल्ली विंचूर ता. निफाड ) व राम बालक कुमार रामदेव पासवान (26, लक्ष्मीपुरा ता. खजोली जि मधुबानी बिहार, ह मु. विंचूर ) यांना अटक करण्यात आलेली आहे.
राज्य उत्पादन शुल्कच्या येवला विभागाच्या पथकाला विंचूर येवला रोडवरील जय भगवती बंगल्यात बनावट दारूचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाली होती पथकाने अधीक्षक संतोष झगडे उपअधीक्षक अमृत तांबारे यांच्या मार्गदर्शनाखाली येवला पथकाचे निरीक्षक प्रकाश घायवट यांच्या पथकाने शुक्रवारी छापा टाकला त्यावेळी जय भगवती बंगल्यात विविध ब्रँडच्या विदेशी दारूच्या दोन लाख वीस हजार 670 रुपयांचा साठा आढळून आला. या ठिकाणी या विदेशी बनावट दारूला लावण्यात येणारे लेबल बोच बाटल्या यांसह एक मोबाईल असा एकूण दोन लाख 87 हजार 424 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी येवला पथकाचे निरीक्षक प्रकाश घायवट दुय्यम निरीक्षक प्रवीण मंडलिक, मनीष पाटील, अवधूत पाटील, मुकेश निंबेकर, संतोष मुंडे, सुनील टापरे, विठ्ठल हाके, योगेश म्हस्के, दीपक नेमणार यांच्या पथकाने कारवाई केली.
0
4
2
9
5
7


