ब्रेकिंग
लासलगावच्या नूतन इंग्लिश मीडियम स्कूलची एस.एस.सी. परीक्षेतील १००% निकालाची परंपरा कायम

0
4
6
1
9
1
लासलगावच्या नूतन इंग्लिश मीडियम स्कूल ची एस.एस.सी. परीक्षेतील १००% निकालाची परंपरा कायम
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रु/ मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या परीक्षेत शाळेतील एकूण ५६ विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते. त्यात ९२.२० % गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान शिवांजली देवढे या विद्यार्थिनीने मिळवला. ९१.०० % गुण मिळवून ईश्वरी खैरे द्वितीय क्रमांक , ..८९.६ % गुण मिळवून वैष्णवी गांगुर्डे तृतीय क्रमांक , ८९.२० % गुण मिळवून नीलम चौधरी चतुर्थ क्रमांक तर ८६.२० % गुण मिळवून सिद्धी भडांगे आणि वैष्णवी बोढारे यांनी पाचवा क्रमांक पटकावला अशी माहिती मुख्याध्यापिका शितल आचार्य यांनी दिली. एकूण ५६ विद्याध्यांपैकी २ विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा अधिक, २० विद्यार्थी ८० ते 90 टक्के , २४ विद्यार्थी ७० ते ८० टक्के,७ विद्यार्थी ६० ते ७० आणि उर्वरित ३ विद्यार्थी ६० टक्के पर्यंत मार्क मिळवत उत्तीर्ण झाले. विषय निहाय प्रथम आलेले विद्यार्थी ईश्वरी खैरे (९७ गुण गणित), शिवांजली देवढे (९५ गुण समाजशास्त्र), नीलम चौधरी.(९४ गुण विज्ञान), श्रद्धा गायकवाड (९२ गुण हिंदी), वैष्णवी गांगुर्डे (८७ गुण इंग्रजी) तर नीलम चौधरी भाविका नरोटे शिवांजली देवढे व तनिष्का शिंदे (८५ गुण मराठी)
गुण मिळाले.
संस्थेचे मार्गदर्शक व जनरल सेक्रेटरी गोविंदराव होळकर यांनी इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शाळा व्यवस्थापन समितीचे चेअरमन अॅड. संदीप होळकर, सदस्य हसमुख पटेल, योगेश पाटील, सचिन मालपाणी, चंद्रशेखर होळकर यांनी यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका शितल आचार्य , उपमुख्याध्यापिका मिनल होळकर, परीक्षा विभाग प्रमुख नीता जेजुरकर, माध्यमिक विभाग प्रमुख व वर्गशिक्षक तुकाराम केदारे, विशाखा केंगे, मंजू वाधवा, प्रमिला ढोमसे, शुभांग घोटेकर, मृणाल बकरे आदींनी मार्गदर्शन केले.
0
4
6
1
9
1


