Breaking
ई-पेपरनोकरीशैक्षणिकसत्कारसामाजिक

सेवेची ३७ वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करून वसंत सुपारे सर सेवानिवृत्त

0 4 2 9 5 7

सेवेची ३७ वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करून वसंत सुपारे सर सेवानिवृत्त

सागर निकाळे, निफाड –

पदवीधर प्राथमिक शिक्षक निफाड नं. १ ता. निफाड येथील ज्येष्ठ शिक्षक श्री. वसंत पांडुरंग सुपारे (सर) यांचा ३७ वर्षांच्या प्रदीर्घ, गुणवत्तापूर्ण आणि निष्ठावान सेवेनंतर नियत वयोमानानुसार दिनांक ३१ मे २०२५ रोजी सेवानिवृत्ती झाली. त्यांच्या सेवापूर्ती निमित्ताने शनिवार, दि. १२ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता, महालक्ष्मी लॉन्स, रसलपूर फाटा, निफाड येथे भावूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केशव तुंगार (शिक्षण अधिकारी, योजना विभाग) होत्या. कार्यक्रमास सर्व आजी-माजी अधिकारी, पंचायत समिती निफाडचे पदाधिकारी, कर्मचारी वृंद, तसेच निफाड शहरातील राजकीय, शैक्षणिक, सामाजिक व विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा.जी.जि.प.सदस्स भाऊसाहेब भवर .शारदाताई कापसे (नगराध्यक्ष, निफाड नगरपंचायत), अनिल अण्णा कुंदे (उपनगराध्यक्ष, निफाड नगरपंचायत), शिवा सुराशे (माजी सभापती), रत्नमाला कापसे (माजी नगराध्यक्ष), देवदत्त कापसे (माजी नगरसेवक), सागर निकाळे (पत्रकार व संस्थापक – माणुसकी फाउंडेशन), विक्रम रंधवे (जिल्हा प्रमुख – शिवसेना युवा सेना), विलास निरभवने सर (व्हाईस चेअरमन), संजय गाजरे (संचालक – अर्बन बँक) सुनिल निकाळे (सरचिटणीस येवला मुक्ती प्रतिष्ठान ), भारव्दाज पगारे.नंदु कापसे.संजय गाजरे.युवक काँग्रेसचे साचिन खङताळे . पांङुरंग कर्ङीले. गोसावी दत्तु.विनायक शिदे.बाळनाथ शिदे. दिलिप कापसे. रखमाजी सुपारे. मोरे चंद्रशेखर.रमा मोरे.भारती सुपारे.आदि मान्यंवर उपस्थितीत होते.

कार्यक्रमाचे सुञसंचलन सुहास सूरळीकर यांनी केले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व समिती – निफाडचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन समस्त सुपारे परिवार, दाभाडी आणि निफाड तालुक्यातील सर्व शिक्षक वृंद यांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमात सुपारे सरांच्या कार्याची प्रशंसा करत अनेकांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचा शेवट सत्कार समारंभ, मनोगते व स्नेहभोजनाने झाला. संपूर्ण वातावरण हे स्नेह, आदर व कृतज्ञतेने भरलेले होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे