Breaking
ब्रेकिंग

परप्रांतीयासह दोन आरोपी जेरबंद ; पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त ; लासलगाव पोलिसांची कारवाई

0 4 8 6 6 6

परप्रांतीयासह दोन आरोपी जेरबंद ; पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त ; लासलगाव पोलिसांची कारवाई

किरण कुमार आवारे…

शिरवाडे वाकद:- रविवार दि.२३ ऑगस्ट रोजी पहाटे ३.४५ च्या सुमारास थेटाळे ते सोनेवाडी रस्त्यावर थेटाळे शिवारात रात्रीच्या गस्ती दरम्यान लासलगाव पोलिसांनी एक परप्रांतीयासह दोन आरोपी जेरबंद केले असून त्यांच्याकडून पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

       आरोपींकडून १ लाख ५० हजार रुपये किमतीची टाटा कंपनीची इंडिगो सी.एस कार (एम.एच.१२ जी.के.२०९०), ३०० रुपये किमतीचा वायर कटर, तसेच २५ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा एकूण १ लाख ७५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

      पो.हवा.अरुण डोंगरे यांचे यांचे फिर्यादीवरून सदर आरोपींच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम १२२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी ईरशाद हसरत अली (वय २३, मूळ रा. फुलपुर राजा, पोस्ट बिस्कोहर, ता. त्रिलोकपूर, जि. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश; हल्ली रा. नानेगाव, नाशिक) आणि सुदर्शन गोरखनाथ आडके (वय २६, रा. नानेगाव, ता. जि. नाशिक) यांना लागलीच अटक करण्यात आली.

   ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि सागर कोते, पो. हवा अरुण डोंगरे व पो.कॉ.चंदू मांजरे यांनी केली. पुढील तपास पो. हवा उत्तम गोसावी करीत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 6 6 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे