Breaking
ब्रेकिंगराजकिय

भुजबळ कुटुंब रंगले प्रचारात… येवला नगरपालिका निवडणूक

0 4 2 9 5 7

येवला,दि.२६नोव्हेंबर:- येवला नगरपालिका निवडणुकीत प्रचाराला जोर आला असून अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचे कुटुंब प्रचारात सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे. त्यांचे पुत्र तथा विधान परिषदेचे आमदार पंकज भुजबळ, स्नुषा तथा मुंबई एमईटीच्या व्यवस्थापकीय संचालक विशाखा, पुतणे तथा माजी खासदार समीर भुजबळ, स्नुषा तथा नाशिक एमईटीच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ.शेफाली भुजबळ शहर परिसरात मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. विकासाचा भुजबळ पॅटर्न तसेच येवल्याच्या विकासाचा वचननामा जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी शहरातील कानाकोपरा पिंजून काढत आहेत. जनतेचीही त्यास मोठी साथ लाभत आहे. त्यामुळे ही बाब अतिशय चर्चेची ठरत आहे.

येवला नगरपरिषदेच्या निवडणुकीला चांगलाच जोर आला आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्यावर नुकतीच मुंबईमध्ये हृदयशस्त्रक्रीया करण्यात आली आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ते मुंबईतील निवासस्थानी उपचार घेत आहेत. असे असले तरी येवला वचननाम्याचे मंत्री भुजबळ यांनी मुंबईतून अनावरण केले. तर इकडे येवला शहरात भुजबळ कुटुंबातील चार जण डेरा टाकून आहेत. त्यांच्याकडून शहरातील विविध भागात नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत.

येवला नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, रिपाइं आणि घटक पक्षांची महायुती लढत आहे. नगराध्यक्षपदासाठी उपमहाराष्ट्र केसरी राजेंद्र लोणारी यांना महायुतीने उमेदवारी दिली आहे. माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडे येवला नगरपरिषद निवडणूक प्रचाराची धुरा आहे. त्यांच्या पत्नी डॉ.शेफाली या पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांसह ठिकठिकाणी भेटी देत आहेत. माजी आमदार पंकज भुजबळ यांनीही व्यावसायिकांसह विविध घटकांच्या भेटी सुरू केल्या आहेत. त्यांच्या पत्नी सौ विशाखा या सुद्धा महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह मतदारांपर्यंत पोहचत आहेत. सध्या लग्नसराई सुरू आहे. त्यामुळे लग्नघरासह विवाह मंडपापर्यंत भुजबळ कुटुंबातील व्यक्ती पोहचत आहे.

मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात गेल्या वीस वर्षांमध्ये केलेली विकासकामे ही येवला नगरपरिषदेतील जमेची बाजू आहे. त्याचा भुजबळ कुटुंबियांकडून प्रामुख्याने प्रचार केला जात आहे. तसेच, महायुतीने दिलेले उमेदवार हे तळमळीने कार्य करणारे आहेत. त्याचबरोबर सामान्य कार्यकर्ते आणि जनतेत मिळून मिसळून कार्य करणारे असल्याने भुजबळ कुटुंबियांकडून या उमेदवारांसमवेत प्रचार दौरा सुरू आहे.

येवला शहरातील पैठणीउद्योगाला आलेले भरभराटीचे दिवस, पाण्याचा संपलेला दुष्काळ यासह विविध महत्त्वाचे मुद्दे प्रचाराच्या अग्रस्थानी आहेत. शहरातील अनेक रस्ते काँक्रिटचे झाल्याने येवलेकरांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

पैठणी व्यावसायिकांकडून आभार

भुजबळ कुटुंबातील व्यक्ती जेव्हा पैठणी व्यावसायिकांना भेटत आहेत तेव्हा वेगळेच चित्र पहायला मिळत आहे. वीस वर्षांपूर्वी येवल्यात पैठणीची केवळ ४ ते ८ दुकाने होती. मात्र, मंत्री छगन भुजबळ यांच्यामुळे पैठणी दुकानांची संख्या ५५० वर गेली आहे. येवला पैठणीला जीआय मानांकनही मिळाले आहे. येवला पैठणीचे होत असलेले ब्रँडिंग पाहता या व्यवसायाला मोठी भरारी प्राप्त झाली आहे. मंत्री भुजबळ यांच्यामुळे येवला पैठणीला सुगीचे दिवस आले आहेत. यासंदर्भात पैठणी व्यवसायिकांकडून भुजबळ कुटुंबियाचे आभार मानले जात आहेत. या व्यावसायिकांकडून त्यांचे उत्स्फुर्त स्वागतही केले जात आहे. दरम्यान, लवकरच नाशिक, मुंबई, पुणे या शहरांमध्ये पैठणी फेस्टिव्हल भरविला जाणार आहे. त्यामुळे पैठणी व्यवसायाला आणखी गती मिळेल, असे भुजबळ कुटुंबियांकडून सांगितले जात आहे.

डोक्यावरुन हात फिरवतात तेव्हा…
माजी खासदार समीर भुजबळ हे शहरातील एका गल्लीमध्ये गेले असता सर्वच आश्चर्यचकित झाले. किराणा दुकानातील एका वृद्धाने चक्क समीर भुजबळ यांच्या यांच्या डोक्यावर हात ठेवले. ‘तुम्हा भुजबळ कुटुंबियांना दीर्घायुष्य लाभो, जनतेची तुम्ही अशीच सेवा करीत राहो’, असे आशिर्वाद या वृद्धाने कृतज्ञतापूर्वक दिले. हे पाहून समीर भुजबळ यांनाही गहिवरुन आले. तसेच, उपस्थितांमध्येही हा सर्व प्रसंग अतिशय चर्चेचा ठरला. भुजबळ कुटुंबियांनी येवला शहरात विकासाचे राजकारण कसे केले याचा प्रत्यय यानिमित्ताने येत आहे.

– विकास भुजबळ

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे