मेंगाळवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्य वाटप
विद्यार्थ्यांनी दर्जेदार यशस्वी शिक्षण घेऊन नाव उंचवावे : सारिका अहिरराव
इगतपुरी : आदिवासी समाजातील विध्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रवाहात येणे गरजेचे आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात कोठेही मदत लागल्यास ती पूर्ण करू, शिक्षण हे वाघिणीचे दुुध असून विद्यार्थ्यांनी फायदा घेऊन दर्जेदार यशस्वी शिक्षण घेऊन नाव उंचवावे असे आवाहन वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांनी केले. इगतपुरी तालुक्यातील मेंगाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव, पोलीस नाईक प्रवीण काकड यांनी आपणही समाजाचे काहीतरी देने लागतो ह्या हेतूने सामाजिक बांधिलकीमधून आदिवासी दुर्गम भागात नुकतेच विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आल्याने आदिवासी मुलांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. याप्रसंगी पोलीस नाईक प्रवीण काकड यांना जन्मदिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. याप्रसंगी मुख्याध्यापक शिवाजी फटांगरे, शिक्षिका माधवी साळुंके, होमगार्ड रोहित सोनवणे, शालेय समिती अध्यक्ष खंडू भारती आदी उपस्थित होते.