Breaking
कृषीवार्ता

ॲग्रोकेअर कृषिमंचचे कृषि प्रेरणा पुरस्कार जाहीर

१ जुलै कृषिदिनी बळीराजाचा होणार सन्मान

0 3 2 1 2 3

इगतपुरी ( प्रतिनिधी )

अॅग्रोकेअर कृषीमंचचे कृषी क्षेत्रातील राज्यस्तरीय स्व. वसंतराव नाईक कृषी प्रेरणा पुरस्कार नुकतेच जाहीर झाले असून पुरस्काराचे वितरण १ जुलैला कृषिदिन व १७ व्या वर्धापनदिनानिमित्त दुपारी २ वाजता गुरुदाक्षिना ऑडीटोरियम, कॉलेज रोड, नाशिक येथे करण्यात आले असल्याची माहिती आयोजक कृषीभूषण ग्रोवर्स प्रोड्यूसर कंपनीचे चेअरमन भूषण निकम, रोहिणी पाटील यांनी दिली. पुरस्कारात शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी उद्योजक, कृषी विस्तारक, कृषी संशोधक, कृषी विभागातील अधिकारी, कृषि संस्था, महाविद्यालये, डॉक्टर, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यांच्यासाठी एक विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्ष म्हणून शिलोंग येथून रिजनरेशन प्रोजेक्ट ऑफ़ मेघालयाचे संचालक डॉ. सूर्या गुंजाळ, नाशिकचे विभागीय कृषि सहसंचालक मोहन वाघ, कृषी व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याप्रसंगी गरीब व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांना शालेय साहित्य व धान्य वाटप करण्यात येणार आहे तर २ लाख २५ हजार रुपयाचा धनादेश वितरीत करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्रातील १० शेतकरी उत्पादक कंपनीचे लोगो अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

5/5 - (1 vote)

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे