
0
2
5
5
5
9
कपालेश्वर येथे मनु मानसी महिला बहुउद्देशिय सेवाभावी संस्था नाशिक यांच्या वतीने महाशिवरात्री निमित्त प्रसाद वाटप
इगतपुरी ( प्रतिनिधी ) सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या मनु मानसी महिला बहुउद्देशिय सेवाभावी संस्था नाशिक यांच्या वतीने महाशिवरात्र उत्सव प्रसाद वाटप करून साजरा करण्यात आला. मनु मानसी संस्थेच्या वतीने महाशिवरात्र निमित्त कपालेश्वर येथे 1008 लाडू आणि केळीचे वाटप भाविक भक्तांना करण्यात आले. मनु मानसी संस्था सामाजिक कार्या बरोबरच धार्मिक कार्यात प्रयत्न करत असते. ही संकल्पना मेघा शिंपी यांनी श्रद्धा दुसाने ताई यांना सांगितली. ताईंच्या साह्याने हा उपक्रम प्रसन्न , भक्तिमय आणि आनंदी वातावरणात करण्यात आला. या उपक्रमासाठी सौ. मेघा शिंपी, संस्थापिका, श्रद्धा दुसाने, सौ कविता पाटील, मिरा आवारे, सुरेखा घोलप, मंजू जाखाडी, विनया नागरे, कविता गायके, लीना गिरमे, शोभा सावंत, रुपाली कोठूळे, पल्लवी कुलकर्णी, छाया कोठावदे, रचना चिंतावार, सुनिता बाविस्कर या सर्व टीमचे योगदान लाभले.
0
2
5
5
5
9