क्रिडा व मनोरंजन
सॉलिट्यूड हॉलिडे अॅप: प्रवासाची नवी क्रांती
शुभांगी गोखले, सायली संजीव, अभिज्ञा भावे, यशोमान आपटे आदी सेलिब्रिटींसोबत करा जगाची सैर

0
2
5
6
2
9
सॉलिट्यूड हॉलिडे अॅप: प्रवासाची नवी क्रांती
शुभांगी गोखले, सायली संजीव, अभिज्ञा भावे, यशोमान आपटे आदी सेलिब्रिटींसोबत करा जगाची सैर
ट्रॅव्हल लव्हर्स आपल्या प्रवासप्रेमींसाठी अनोखा ॲप घेऊन येत आहेत. ‘सॉलिट्यूड हॉलिडे’ असे या ॲपचे नाव असून यामुळे आता प्रवास अधिकच अविस्मरणीय होणार आहे. या अॅपद्वारे आता सेलिब्रिटींसोबत जगभर प्रवास करण्याची संधी मिळणार असून प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन तयार केलेल्या या अॅपमुळे प्रवासी त्यांच्या आवडीनुसार व बजेटनुसार प्रवासाचे नियोजन करू शकतात. या अॅपचा उद्देश प्रवाशांना जगभरातील अनोखी स्थळे शोधण्याची आणि सुखद आठवणी तयार करण्याची संधी देणे आहे. या अॅपमध्ये विविध प्रकारच्या प्रवाशांसाठी खास सेवा उपलब्ध आहेत. अॅपच्या सहाय्याने प्रवासी त्यांच्या आवडीनुसार, बजेटनुसार खास प्रवासाचे पर्याय निवडू शकतात. प्रवाशांना एकत्र आणणारे कम्युनिटी फोरम हे या अॅपचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. याद्वारे जगभरातील इतर प्रवाशांशी संवाद साधता येईल, अनुभव शेअर करता येईल, आणि तुम्हाला हवे असलेले प्रवासासंबंधित सल्लेही मिळतील.
‘सॉलिट्यूड हॉलिडे’ची खास वैशिष्ट्ये म्हणजे सेलिब्रिटी टूर्स. प्रवाशांना त्यांच्या आवडत्या कलाकारांसोबत जगाची सैर करण्याची संधी हा अॅप देतो. सेलिब्रिटी टूर्समध्ये प्रख्यात कलाकारांसोबत प्रवास करण्याची संधी मिळणार असून, त्यांच्यासोबतचे खास क्षण अनुभवण्याची संधीही मिळेल.
या टूरमधली पहिली टूर एप्रिलमध्ये हिंदी अभिनेता मनमोहन यांच्यासोबत नेपाळ येथे असेल. दुसरी टूर मे महिन्यात मराठी अभिनेता ओमप्रकाश शिंदे याच्यासोबत काश्मीरला, तिसरी टूर जूनमध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेत्री शुभांगी गोखले यांच्यासोबत असून चौथी टूर सप्टेंबर महिन्यात अभिनेत्री सायली संजीवसोबत मालदीवला असेल. ऑक्टोबरमध्ये पाचवी टूर मराठी व हिंदीमध्ये कामगिरी करणाऱ्या अभिज्ञा भावेसोबत असेल तर सहावी टूर नोव्हेंबरमध्ये मराठी अभिनेता यशोमान आपटे याच्यासोबत मेघालय येथे असेल.
‘सॉलिट्यूड हॉलिडे’च्या सीओओ गार्गी फुले म्हणतात, “सॉलिट्यूड हॉलिडे अॅपच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक प्रवाशाला त्यांचा स्वप्नातील प्रवास साकार करण्याची संधी देत आहोत. प्रवासाचं नियोजन सोपं, सुलभ बनवणे आमचे उद्दिष्ट आहे. ॲपद्वारे तर बुकिंग करता येणारच आहे. त्याचसोबत तुम्ही ॲाफिसमध्ये येऊन किंवा फोनवरही बुकिंग करू शकता. प्रवाशांच्या सोयीनुसार ते आपली ट्रीप बुक करू शकतात. आमच्या विविध टूर्स आहेत. आपल्या आवडीनुसार ट्रीप निवडता येणार असून सेलिब्रिटी टूर्समुळे प्रवाशांना आवडत्या कलाकारांसोबत जगभर फिरण्याची अनोखी संधी मिळेल, ज्यामुळे प्रवासाचा अनुभव अधिक खास आणि अविस्मरणीय होईल.”
0
2
5
6
2
9