
0
3
2
1
2
3
बाळासाहेब सोनवणे यांना समाज रत्न पुरस्कार जाहीर
१ मे महाराष्ट्र दिनी होणार सन्मान
नाशिक: प्रतिनिधी
निफाड तालुक्यातील मांजरगाव येथील भूमिपुत्र, महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष तसेच महिरावणी येथील मातोश्री गि.दे.पाटील माध्यमिक विद्यालयाचे आदर्श व उपक्रमशील शिक्षक म्हणून बाळासाहेब दादा सोनवणे यांची ओळख आहे. त्यांच्या शैक्षणिक,सामाजिक,धार्मिक,दिव्यांग आदी क्षेत्रातील योगदानाबद्दल नाशिक येथील मनु मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने १ मे महाराष्ट्र आणि कामगार दिनानिमित्त “समाज रत्न” पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
सोनवणे हे निफाड तालुक्यातील मांजरगाव येथील रहिवाशी असून, नाशिक येथील ज्ञान साधना शिक्षण प्रसारक संस्थेत गेली ३० वर्षापासून अध्यापनाचे कार्य करत आहेत. शिक्षकांबरोबरच महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेच्या माध्यमातून दिव्यांग कर्मचारी तसेच बेरोजगार यांना शासनाच्यावतीने सवलती मिळवून देत २५ वर्षापासून पुनर्वसन करण्याचे काम करत आहे. डॉ.एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनच्यावतीने जिल्हासमन्वयक म्हणून विद्यार्थी बालवैज्ञानिक बरोबरच मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करत आहे.
बहु आ यामी व्यक्तिमत्व असलेल्या सोनवणे यांच्या विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल म्हणून मनु मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष मेघा शिंपी तसेच पदाधिकारी यांनी बाळासाहेब सोनवणे यांना “समाज रत्न” पुरस्कार जाहीर केला असून, सर्वच क्षेत्रातून कौतुक होत आहे.
0
3
2
1
2
3