Breaking
ई-पेपरगुन्हेगारीब्रेकिंग

कन्नड औट्रम घाटात ४२ किलो वजनाचा ६५ कोटीचा ड्रग्ज साठा जप्त

0 4 2 9 5 7

यशवंतराव ताडगे,  चाळीसगाव प्रतिनिधी : –

चाळीसगाव छत्रपती संभाजीनगर महामार्गावर चाळीसगाव नजिकच्या कन्नड औट्रम घाटात
दिल्लीहून ,बंगरूळला जाणारे ६५ कोटीचे ४२ किलो वजनाचा ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला असून , कार चालक यास ताब्यात घेतले आहे. त्यास अटक करण्यात आली. यामागे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी करणारी टोळी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कार चालक हा दिल्ली येथील असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. या गुन्ह्यात दहा दिवसांपूर्वी नवीन खरेदी केलेली कार वापरण्यात आली आहे. ही कारवाई कन्नड औट्रम घाटातील , महामार्ग चाळीसगाव पोलिसांननी केलेली कारवाई ही
सर्वात मोठी कारवाई आहे. एवढा किंमतीचा ड्रग्ज साठा चाळीसगाव पोलिसांनी पकडल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

दिल्लीहुन ,कर्नाटक, राज्यातील बंगरूळ येथे जाणाऱ्या कारमधून सुमारे ६४ कोटी ९८ लाख ५७ हजार ५८९ रूपये किमतीचा अँन्फेटामाइन या नावाचा  ४२ किलो ड्रग्जचा साठा चाळीसगाव जवळील  कन्नड औट्रम घाटाच्या पायथ्याशी दिनांक १४ जुलै रोजी गुरुवारी  रात्री पकडण्यात आला. या प्रकरणी पोलीसांनी अब्दुल असीम सैय्यद रा. दिल्ली या कारचालकाला अटक करण्यात आली असून हे
ड्रॅग्ज  कुणाकडे पाठवले जात होते. याचा पोलीस तपास घेत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.  महेश्वर रेड्डी यांनी दिली. दरम्यान या घटनेच्या आरोपींच्या शोधासाठी तीन पथके तयार करण्यात आले आहेत.

चाळीसगाव महामार्ग पोलीस गुरुवार दि.२४ रोजी रात्री ७ ते ८ वाजेच्या सुमारास नियमीतपणे नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करीत असतांना धुळ्याकडून कन्नडकडे  जात असलेल्या डीएल. ९ सीबीबी. ७१७१ ही लाल रंगाची कार पोलीसांनी संशयावरून थांबवली. पोलीसांनी कारची कागदपत्रे विचारली असता, तो व्यवस्थीतपणे उत्तरे देवू शकला नाही. कारच्या मागच्या सीटवर काय आहे असे विचारले असता चालकाने रासायनिक पदार्थ
असल्याची बतावणी केली. पोलीसांना संशय बळावल्याने त्यांनी कारची पाहणी केली असता त्यात दोन सुटकेस व दोन बॉक्स मिळून आले. त्याची पाहणी केली असता अंमली पदार्थ असावेत असा संशय महामार्ग पोलीसांना आला. त्यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक शंका मुटेकर यांना माहीती दिली . तसेच फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले असता, बॉक्समध्ये अँम्पेटामाईन हे ड्रग्ज असल्याचे निष्पन्न झाले. त्याचे वजन केले असता ते ४३ किलो निघाले. पोलीसांनी कार, मोबाईल, बॅग असा सुमारे ६४ कोटी, ९८ लाख, ५० हजार, ५९० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून कारचालक अब्दुल आसिम सैय्यद (४८) रा. ए-२६३ तिसरा मजला, बटला हाऊस,जमिया नगर, ओखला नवीदिल्ली यास ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई महामार्ग पोलीस केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सावंत, उपनिरीक्षक शशिकांत पाटील, अमोल कवडे, हवालदार महेंद्र अहिरराव, योगेश पवार, अमीर तडवी, संदीप जगताप, शेषराव राठोड, सतीष हाळनोर, सागर सोनवणे, पोकॉ. अतुल सोनवणे, चालक एएसआय संदीप पाटील यांनी केली. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
चौकशीसाठी तीन पथके दरम्यान पोलीस अधीक्षकांच्या सुचनेप्रमाणे तीन वेगवेगळी पथके तयार करण्यात आली असून आरोपींचा शोध घेण्याकरीता हे पथके रवाना झाल्याचे तपासी अधिकारी अमितकुमार मनेळ यांनी सांगितले,

चालकाची ड्रग्जच्या गुन्ह्यात यापूर्वी जेलवारी

दरम्यान या ट्रक्स ट्रक ड्रग्ज जप्ती संबंधी कारवाईची माहिती देतांना पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सांगितले की, ड्रग्जची वाहतुक करणारा कारचा चालक अब्दुल असीम सैय्यद रा. नवीदिल्ली हा अशाच प्रकारच्या गुन्ह्यात ५ ते ६ वर्षे जेलमध्ये होता. त्याची चौकशी केली असता हे ड्रग्ज दिल्ली येथून बंगरूळला नेण्यात येत होते अशी माहिती तपासात उघड झाली आहे. चालकाने ही कार दहा दिवसापूर्वीच घेतली अशी माहितीही जळगांव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी सांगितले आहे. अधिक तपास पोलीस करीत असून या घटनेचा तपास चाळीसगाव शहर पोलील निरीक्षक अमितकुमार मनेळ हे करीत असल्याचे त्यांनी यावेळी डॉ.रेड्डी यांनी म्हटले आहे. ड्रग्ज  तस्करीशी स्थानिक पातळीवर संबंध आहेत काय? अशी पत्रकारांनी विचारणा केली असता चाळीसगाव किंवा जळगाव जिल्हयाशी संबंधाबाबत तसे तरी काही पुरावे समोर आले नसल्याचे देखील पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात पहिल्यांदाच मोठी कार्यवाही झाली आहे. ड्रग्जची वाहतुक करणारा कारचालक हा दिल्लीहून बंगरूळला जात होता. इंदूरहून, धुळे मार्गे तो चाळीसगावी आला. पुढे छत्रपती संभाजीनगरकडे जात असतांनाच चाळीसगाव महामार्ग पोलीसांच्या तपासणीत अडकला आणि कोट्यावधी रूपयांचे ड्रग्ज हाती लागले आहे.

चाळीसगाव महामार्ग पोलिसांनी बोढरे फाटा येथे केलेल्या तपासणी दरम्यान एका संशयित वाहनात जवळपास ३९ किलो अँफेटामाईन हा अमली पदार्थ आढळून आला असता  पोलिसांनी सदर वाहनचालक व वाहन ताब्यात घेतले. सदर घटनेची माहिती मिळताच मी तात्काळ महामार्ग पोलीस केंद्र येथे भेट देऊन कारवाई बाबत अधिक माहिती जाणून घेतली मुख्यमंत्रीव गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधून या ड्रग्ज तस्करी बाबत कसून चौकशी करावी अशी विनंती आमदार मंगेश चव्हाण केली असल्याची माहिती दिली.
पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार सदर ३९ किलो अँफेटामाईन ड्रग्ज ची किंमत ४० ते ५० कोटी असण्याची शक्यता आहे. सदर ड्रग्ज हे दिल्ली येथून छत्रपती संभाजीनगर मार्गे कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथे संशयित वाहनचालक घेऊन जात होता. हे केवळ आंतरराज्य रॅकेट नसून यात आंतरराष्ट्रीय कनेक्शन देखील उघडे होण्याची शक्यता आहे. कारण अँफेटामाईन हा अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात विदेशातून तस्करी केला जातो.
अंमली पदार्थांचा पुरवठा वाढवून त्यामाध्यमातून देशातील तरुण पिढीला व्यसनाधीन करणे व देश खिळखिळा करण्याचे काम देशाचे शत्रू करत आहेत.

मी सदर कारवाईबाबत तात्काळ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीषभाऊ महाजन यांना माहिती दिली असून याचा सखोल तपास करण्याची विनंती केली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला, विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. दत्तात्रय कराळे व पोलीस अधीक्षक जळगाव डॉ.महेश्वर रेड्डी यांनीदेखील या कारवाईची गांभीर्याने दखल घेतली असून पुढील तपास युद्धपातळीवर सुरू आहे. ड्रग्जमुक्त महाराष्ट्र या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पाला बळ देणारी ही कारवाई असून सर्व पोलीस प्रशासनाचे मी अभिनंदन करतो. असे आ. चव्हाण शेवटी म्हणाले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे