Breaking
सामाजिक

 ‘ जब तक बच्चन’: फराह खान आणि बोमन इराणीने KBC16 मध्ये अमिताभ बच्चनला दिली चित्रपटाची ऑफर

0 1 5 1 2 3

 ‘ जब तक बच्चन’: फराह खान आणि बोमन इराणीने KBC16 मध्ये अमिताभ बच्चनला दिली चित्रपटाची ऑफर

या शुक्रवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती 16 मध्ये होस्ट अमिताभ बच्चन यांच्यासोबत सुप्रसिद्ध दिग्दर्शक फराह खान आणि अप्रतिम अभिनेता बोमन इराणी एक अविस्मरणीय एपिसोड घेऊन येणार आहेत. हास्य-विनोद, जुन्या आठवणी आणि हृदयस्पर्शी क्षणांनी भरलेला हा एपिसोड असेल. त्यामुळे एका मजेदार राईडसाठी तयार व्हा, कारण हे बॉलीवूडचे दिग्गज त्यांच्या किर्तीला साजेसे विनोद, मोहकता घेऊन KBC च्या हॉटसीटवर येत आहेत.

गंमतीदार संभाषणाच्या ओघात फराह खानने सांगितले की, 2014 मध्ये ‘हॅपी न्यू यर’ नंतर तिने एकही चित्रपट केलेला नाही, कारण एकमेवाद्वितीय अमिताभ बच्चन सोबत काम करण्याचा विचार ती करत होती. बोमनही दिग्दर्शक झाल्याचे नमूद करून ती पुढे म्हणाली, “कोणत्याही दिग्दर्शकाचा आलेख तोपर्यंत उंचावत नाही, जोपर्यंत ती ब्लू टिक त्याला मिळत नाही. आणि ते फक्त तेव्हाच होते, जेव्हा तुम्ही अमितजींसोबत चित्रपट करता.”

यावर अमिताभ बच्चन हसत हसत म्हणाले, “पुढचे प्रश्न सोपे यावेत या आशेने हे दोघे असं म्हणत आहेत. पण, तसं अजिबात होणार नाही.”

आपापल्या चित्रपटात बिग बींना घेण्यासाठी आपण किती आतुर आहोत हे दाखवण्यासाठी फराह खान आणि बोमन इराणी यांनी अमिताभ बच्चन यांना अचानक चित्रपटाचा प्रस्ताव देऊन धक्का दिला. ते खेळकरपणे म्हणाले, “सर, तुमच्यासाठी आमच्याकडे एका चित्रपटाचा कॉंट्रॅक्ट आहे.” फराहने तिच्या खास विनोद शैलीत जाहीर केले की या चित्रपटाचे नाव ‘जब तक बच्चन’ असे आहे कारण ‘जब तक सूरज चाँद रहेगा, बच्चन जी का नाम रहेगा!”

आश्चर्याने बिग बींच्या भुवया उंचावलेल्या पाहून फराहने चित्रपटाच्या शीर्षकाचे इतर पर्याय सुचवले, जसे की, ‘बच्चन नंबर 1’ आणि ‘ओन्ली बच्चन’. अमिताभ बच्चन यांनी हसत हसत त्या कराराच्या अटी आणि शर्ती वाचण्यास सुरुवात केली. या हलक्या-फुलक्या गप्पांमधून, त्यांनी केलेल्या कौतुकातून त्या दोघांना अमिताभ बच्चन या महानायकाविषयी असलेला आदर स्पष्ट दिसला. त्या दोघांच्या खास विनोदी ढंगामुळे बिग बी आणि प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन झाले.

या शुक्रवारी अमिताभ बच्चन, फराह खान आणि बोमन इराणी यांच्यासोबत धमाल क्षण अनुभवा, कौन बनेगा करोडपती 16 मध्ये रात्री 9 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 5 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे