सैनिकी वसतिगृहे व विश्रामगृहात कंत्राटी पदभरती 30 जूनपर्यंत अर्ज सादर करण्याची संधी
नाशिक (जि. मा. का. वृत्तसेवा) :
सैनिकी मुलांचे व मुलींचे वसतिगृह त्र्यंबक रोड नाशिक आणि माजी सैनिक विश्रामगृह, जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे अशासकीय कर्मचाऱ्यांची तात्पुरत्या स्वरूपात विविध पदासांठी पदभरती प्रस्तावित आहे. यासाठी इच्छुक माजी सैनिक, वीरपत्नी व नागरिक यांनी 30 जून 2024 पर्यंत आपले अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक अधिकारी निवृत लेफ्प्टनंट कमांडर ओंकार कापले यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
असा आहे पदभरतीचा तपशिल…
• सैनिकी मुलांचे वसतिगृह नाशिक
1. चौकीदार, पदसंख्या 1 (पुरूष) , मानधन रूपये 20 हजार 886 मात्र
2. स्वयंपाकी, पदसंख्या 3 (महिला), मानधन रूपये 13 हजार 924 मात्र
3. सफाईकामगार, पदसंख्या 1, मानधन रूपये 13 हजार 89 मात्र
• सैनिकी मुलींचे वसतिगृह, नाशिक
1. स्वयंपाकी, पदसंख्या 2 (महिला), मानधन रूपये 13 हजार 924 मात्र
2. सफाईकामगार, पदसंख्या 1(महिला), मानधन रूपये 13 हजार 89 मात्र
• माजी सैनिक विश्रामगृह, नाशिक
1. सफाईकामगार, पदसंख्या 1, मानधन रूपये 13 हजार 89 मात्र
याबाबत अधिक माहितीसाठी 0253-2970755 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.