गुन्हेगारीब्रेकिंगसामाजिक
खा. संजय दिना पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
विंचूर प्रेस क्लब च्या वतीने लासलगाव पोलीस ठाण्यास निवेदन सादर

0
4
7
4
5
4
विंचूर राज्यातील पत्रकारांवर दिवसेंदिवस पत्रकारांना धमक्या देणाऱ्या खा. संजय दिना पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
राज्यातील पत्रकारांवर दिवसेंदिवस हल्ले होत आहेत. तसेच आता तर लोकप्रतिनिधीही पत्रकारांना धमक्या देत आहेत. ही लोकशाहीच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. शिवसेना (शिंदे गट) चे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना त्यांना शिवीगाळ केली तसेच असभ्य भाषेत बोलून धमकी दिली आहे. हा प्रकार लोकशाहीला काळीमा फासणारा आहे. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर जर लोकप्रतिनिधीच जर अशा प्रकारे वागत असतील तर ही निंदनिय बाब आहे. खा. संजय दिना पाटील यांच्या प्रकारानंतर राज्यभरातील पत्रकारांमधून संतप्त प्रतिक्रीया उमटत असून या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करुन खा. संजय दिना पाटील यांच्यावर तात्काळ गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन विंचूर प्रेस क्लबच्या वतीने लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना देण्यात आले आहे.
यावेळी विंचूर प्रेस क्लबचे अध्यक्ष किशोर पाटील ,जगन्नाथ जोशी, संदीप शिरसाठ, दीपक घायाळ, भाऊसाहेब हुजबंद आदी उपस्थित होते .
0
4
7
4
5
4



