आरोग्य व शिक्षणनिवडनोकरीमहाराष्ट्रशैक्षणिकसत्कार
व्ही. गायत्री हिचे नेट परीक्षेत सुयश….. तसेच राजेश गवळी यांची मंत्रालय सहाय्यक पदी निवड….

0
2
5
6
5
9
व्ही. गायत्री हिचे नेट परीक्षेत सुयश….. तसेच राजेश गवळी यांची मंत्रालय सहाय्यक पदी निवड….
नाशिकरोड : गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयातील एम. ए. इंग्रजी पार्ट 2 मध्ये शिकत असलेली विद्यार्थिनी व्ही. गायत्री एम. वडिवेलान हिने डिसेंबर २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या यूजीसी नेट परीक्षेत ८८. ८९ % पर्सेंटाइल गुण मिळवून सुयश प्राप्त केले आहे.
त्याचप्रमाणे २०२३-२४ बॅच एम. ए. इतिहासचा विद्यार्थी राजेश काळू गवळी याने महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी ) मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत सुयश प्राप्त करून त्याची ‘ मंत्रालय महसूल सहायक ‘पदी निवड झालेली आहे.
विद्यार्थ्यांच्या या भूषणावह कामगिरीबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. के.सी. टकले, कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार पठारे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. आकाश ठाकूर तसेच इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. घनश्याम बाविस्कर, इतिहास विभाग प्रमुख डॉ. शशिकांत साबळे यासह इंग्रजी व इतिहास विभागातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
Sanjay Paramsagar
0
2
5
6
5
9