Breaking
ई-पेपरदेश-विदेशब्रेकिंगसामाजिक

वी ने छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये ५जी सेवांचा शुभारंभ केला

0 4 2 9 5 7

नाशिक -देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी, वी छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये उद्यापासून आपल्या ५जी सेवांचा शुभारंभ करत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला वी ने नागपुरात ५जी सेवा सुरु केल्या. ज्याठिकाणी वी ला ५जी स्पेक्ट्रम मिळाले आहे अशा १७ प्रायॉरिटी सर्कल्समध्ये २३ शहरांमध्ये ५जी सुरु करण्याच्या मोहिमेचा हा विस्तार एक भाग आहे.

वी चे ५जी उद्या अहमदाबाद, राजकोट, सुरत, वडोदरा, कोझिकोडे आणि मलप्पुरम या ६ इतर शहरांमध्ये देखील सुरु होत आहे. याआधी वी ने ९ शहरांमध्ये ५जी सेवा सुरु केल्या आहेत, यामध्ये मुंबई, दिल्ली-एनसीआर, बंगलोर, म्हैसूर, नागपूर, चंदीगढ, जयपूर, सोनिपत आणि पटना या नऊ शहरांचा समावेश आहे.

छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमधील ५जी डिव्हायसेस वापरणारे वी युजर्स उद्यापासून वी ५जी सेवांचा लाभ घेऊ शकतील. शुभारंभाची ऑफर म्हणून वी २९९ रुपयांपासून पुढील किमतींच्या प्लॅन्सवर युजर्सना अनलिमिटेड ५जी डेटा देत आहे. त्यामुळे ग्राहकांना हाय-डेफिनिशन स्ट्रीमिंग, गेमिंग, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, अधिक वेगवान डाउनलोड आणि रिअल-टाईम क्लाऊड ऍक्सेस यांचा आनंद घेता येईल.

वोडाफोन आयडियाचे ऑपरेशन्स डायरेक्टर श्री रोहित टंडन यांनी सांगितले, “छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये वी ५जी सुरु करताना आम्हाला खूप आनंद होत आहे कारण महाराष्ट्र्रातील अजून दोन प्रमुख शहरांमध्ये कनेक्टिविटीचे भविष्य आम्ही घेऊन येत आहोत. आमच्या प्रचंड शक्तिशाली ४जी सेवांच्या बरोबरीने अत्याधुनिक ५जीची सुरुवात करून आमच्या युजर्सना अधिक जास्त पर्याय आणि वृद्धिंगत अनुभव प्रदान करण्याचा आमचा उद्देश आहे. आम्ही अतिशय पद्धतशीरपणे महाराष्ट्रात ५जी विस्तार करत आहोत, वाढती मागणी आणि ५जी हॅन्डसेट वापरण्याचे वाढते प्रमाण यांना अनुसरून सेवा पुरवण्यासाठी आम्ही बांधील आहोत.”

महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च ५जी अनुभव सुनिश्चित करण्यासाठी, वी ने एरिक्सनसोबत हातमिळवणी केली आहे. नेटवर्कची कामगिरी आपोआप ऑप्टिमाइज व्हावी यासाठी प्रगत, ऊर्जा-बचत सक्षम पायाभूत सेवासुविधा तैनात करण्यासाठी आणि एआय-पॉवर्ड सेल्फ ऑर्गनायजिंग नेटवर्क कार्यान्वित करणे हा या भागीदारीचा उद्देश आहे.

५जी विस्ताराला अनुसरून वी ने महाराष्ट्र आणि गोवा सर्कलमध्ये आपले ४जी नेटवर्क लक्षणीयरीत्या अपग्रेड केले आहे. वाढलेले कव्हरेज, अधिक वेगवान डेटा वेग आणि एकंदरीत सर्वोच्च युजर अनुभव प्रदान करणे हा यामागचा उद्देश आहे. मार्च २०२४पासून वी ने इनडोअर कव्हरेज मजबूत करण्यासाठी ९०० एमएचझेड स्पेक्ट्रम ७९०० साईट्समध्ये तैनात केले आहे आणि २१०० एमएचझेड स्पेक्ट्रम क्षमता ७००० पेक्षा जास्त साईट्सना समाविष्ट केली आहे. २१०० पेक्षा जास्त नवीन साईट्स २२०० शहरांमध्ये वाढवण्यात आल्या आहेत. हे अपग्रेड शहरी व ग्रामीण भागांमध्ये सातत्यपूर्ण व उच्च गुणवत्तापूर्ण कनेक्टिविटी देण्याची वी ची वचनबद्धता अधोरेखित करतात.

ग्राहक व व्यवसायांच्या वाढत्या, बदलत्या डिजिटल गरजा पूर्ण करणारे, भविष्यासाठी सज्ज नेटवर्क उभारण्यासाठी वी वचनबद्ध आहे. उपलब्धता, किंमत आणि ५जी साठी अनुकूल डिव्हायसेसबद्दल अधिक माहितीसाठी कृपया येथे संपर्क साधावा – https://www.myvi.in/5g-network

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे