आरोग्य व शिक्षणशैक्षणिकसत्कार
बिटको महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकास व स्व संरक्षण कार्यशाळा संम्पन्न

0
2
5
6
6
2
बिटको महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकास व स्व संरक्षण कार्यशाळा संम्पन्न….
नाशिकरोड : ” आपल्या विचार, भावना व वर्तन पद्धतीत सुधारणा करणे यामुळे आपण आपल्या जीवनात यशस्वी, उत्साही, आनंदी आणि समाधानी होऊ शकतो लोकसंग्रह, मैत्री वाढवा. त्यामुळे आपल्यात बदल घडवून एक स्व-ओळख निर्माण करा. आपल्यातील वेगळेपण जपा. संवाद कौशल्य वाढवा. यामुळे नक्कीच व्यक्तिमत्वात बदल नक्कीच दिसून येईल, ” असे मार्गदर्शन करतांना बीवायके महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. सुशूमना काणे यांनी केले.
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थीनी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ व्यक्तिमत्व विकास व स्व संरक्षण ‘ कार्यशाळा सेमिनार हॉल मध्ये आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी त्या विद्यार्थ्यांना ‘ व्यक्तिमत्व विकास ‘ या विषयावर मार्गदर्शन करतांना बोलत होत्या.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी, विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी दीपक टोपे, विद्यार्थिनी मंच प्रमुख डॉ. कांचन निकम, डॉ. सुधाकर बोरसे, डॉ. अर्चना पाटील, डॉ. कांचन सनानसे, वन्दना शेवाळे, गीतांजली नायडू, सुजाता टोचे, प्रा. वसीम बेग यासह विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी व डॉ. दीपक टोपे यांनी केले.
तसेच यांनतर नाशिक येथील प्रख्यात कालारीपटू पूजा वेद्विख्यात यांनी ‘ स्व-संरक्षण ‘ या विषयावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. याप्रसंगी त्यांनी कलारीपट्ट ही भारतीय मार्शल युद्धकला असून या युद्ध पद्धतीचा उगम केरळ प्रांतातून झाला. ज्याचा वापर प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी स्वसंरक्षणासाठी चपळाईने केला जातो असे सांगितले.
अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी, ” आपण कसे बोलावे, कसे वागावे, संवाद कसा करावा यासह आपल्याकडील ज्ञान समोरच्या व्यक्तीपर्यंत कसे पोहोचवायचे त्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याचे सांगुन यातून सकारात्मक दिशा मिळून यातून आत्मविश्वास वृद्धिंगत होतो, ” असे सांगितले. याप्रसंगी संस्थेच्या चेअरमन डॉ. सौ. एस. व्ही. संत मॅडम यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दीपक टोपे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ज्योती पेखळे यांनी केले तर आभार डॉ. कांचन सनानसे यांनी मानले.
0
2
5
6
6
2