Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगसामाजिक

येवला तालुक्यात सशस्त्र दरोडा, हाणामारीत चार जण जखमी,

दोन तोळे सोने, पन्नास हजार रुपये लुटून नेले

0 3 2 1 2 1

येवला तालुक्यातील कोळम बुद्रुक येथील आवारे वस्तीवर तीन ते चार जणांनी दरोडा टाकून घरातील महिला व पुरुषांना जखमी केल्याची घटना आज मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, येवला तालुक्यातील कोळम बुद्रुक येथे आवारे वस्ती आहे. येथील रहिवासी उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे घराबाहेर झोपलेले होते. त्याचप्रमाणे आवारे कुटुंबातील पुरुष रात्री घराबाहेर ओट्यावर झोपलेले होते. यावेळी चार दरोडेखोरांनी महिलांना चाकूचा धाक दाखवत मारहाण करून जखमी करत त्यांच्याकडे सोन्याचे दोन तोळ्याचे दागिने तसेच रोख रक्कम 50 हजार रुपये लुटून नेली. दरोड्याच्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

याबाबत जखमी महिलेने सांगितले की, रात्री एक वाजेच्या सुमारास घरात शिरले. त्यांनी चाकूचे वार करून सासरे व पती यांना जखमी केले. यावेळी दरोडेखोरांनी बाळाचे व आमचे दागिने 50 हजार रुपये रोख नेले.

पोलिसांनी श्वान पथक बोलावलेले असून कसून तपास चालू आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे