Breaking
कृषीवार्ता

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानात सहाशे नागरिकांनी घेतला लाभ

0 4 6 1 9 7

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानात सहाशे नागरिकांनी घेतला लाभ 

( येवला पाटोदा येथे शासकीय प्रमाणपत्र शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ) 

नागरिकांनी शासकीय योजनाच्या नोंदीसह त्रुटीची केली पूर्तता

शांतारामभाऊ दुनबळे 

नाशिक :- नागरिकांना विविध योजणांसाठी तहसील कार्यालयात तालुक्याच्या ठिकाणी न जाता ग्रामीण भागामध्ये जलद व पारदर्शकपणे सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पाटोदा येथील विशाखा गार्डन येथेसात मार्च शनिवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबीर टप्पा एकचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे हे होते तर तहसीलदार आबासाहेब महाजन, निवासी नायब तहसीलदार पंकज नेवसे ना छगन भूजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड, माजी जिप सदस्य बाळासाहेब पिंपरकर, ज्ञानेश्वर शेवाळे रतन बोरणारे, सरपंच मोनाली घोरपडे, उपसरपंच संतोष दौंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी प्रांताधिकारी गाढवे यांनी नागरिकांना महसूल व सर्व विभागाच्या सेवा या गावातच व वेळेत पारदर्शकपणे उपलब्ध व्हाव्यात म्हणून या समाधान या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले यावेळी तहसीलदार आबासाहेब महाजन, बाळासाहेब लोखंडे, तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. या शिबिरात पाटोदा मंडळातील सर्वच गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यामध्ये महसूल विभागाच्या वतीने उत्पन्न, रहिवासी जातींचे प्रमाणपत्र, सात बारा आठ अ वाटप फेरफार नोंदी दुरुस्ती आणि नोंदणी ,आधारकार्ड स्टॅल आधार दुरुस्ती, बालकांचे नवीन आधार नोंदणी, आधारकार्डला मोबाईल नं लिंक करणे,बायोमेट्रिक अपडेट करणे ही कामे करण्यात आली. पुरवठा विभागाच्या वतीने रेशनकार्डात नावे टाकणे, नावे कमी करणे, नवीन रेशनकार्डचा लाभ देण्यात आला. महिला व बालविकास विभागाच्या वतीने बेबी किटचे वाटप करण्यात आले.ग्रामपंचायत विभागाच्या वतीने जन्म मृत्यू दाखले, दस्त नोंदणी, पीक कर्ज तर कृषी विभागाच्या वतीने शेतकरी वर्गाला ट्रॅक्टर तसेच शेती औजारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.अशा स्वरूपाच्या सर्व सेवा मिळून सहाशे लाभार्थ्यांनी एकाच छताखाली लाभ घेतला.

कार्यक्रमासाठी निवासी नायब तहसीलदार पंकज नेवसे मंडळ अधिकारी राहुल देशमुख ग्राम महसूल अधिकारी संतोष आठवले.ग्रामविकास अधिकारी अविनाश खाटेकर, सेतू संचालक गोरख घुसळे, संतोष कुंभारकर, निखिल आभाडे, लक्ष्मण आहेर, भारत पाटील, बापू मुरकुटे आदी उपस्थित होते सूत्रसंचालन संतोष लोहकरे यांनी केले. प्रास्ताविक मंडळ अधिकारी राहुल देशमुख यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 1 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे