Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगसामाजिक

ग्रीन कॉरिडॉर व कार्डिएक एअर अॅम्ब्युलन्सच्या मदतीने नाशिकमध्ये यशस्वी यकृत प्रत्यारोपण

0 4 2 9 5 7

वेळेशी शर्यत जिंकली * ग्रीन कॉरिडॉर व कार्डिएक एअर अॅम्ब्युलन्सच्या मदतीने नाशिकमध्ये यशस्वी यकृत प्रत्यारोपण

नाशिक येथील अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाची व ऐतिहासिक वैद्यकीय घटना यशस्वीरीत्या पार पडली. सांगली ते कोल्हापूर दरम्यान ग्रीन कॉरिडॉर आणि त्यानंतर कोल्हापूर ते नाशिक कार्डिएक एअर अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून अवघ्या २ तासांत यकृताची सुरक्षित व जलद वाहतूक करण्यात आली.

यावेळी डॉ. संदीप पाटील, डॉ.संदीप सबनीस आणि डॉ. शरण नरुटे यांच्या विशेष परस्पर सहकार्याने यकृत प्रत्यारोपणाची अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली.

सांगली येथील ६९ वर्षीय रुग्णाच्या नातेवाइकांनी समाजहित जपत उदात्त व जीवनदायी यकृतदानाचा निर्णय घेतला. या दातृत्वामुळे धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील ५१ वर्षीय रुग्णाला, जो तीव्र यकृत सिरोसिसने ग्रस्त होता, नवजीवनाची संधी मिळाली. सदर रुग्ण उपचारासाठी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथे दाखल होता.

प्रकरणाची तातडी लक्षात घेऊन हॉस्पिटलमधील तज्ज्ञ यकृत प्रत्यारोपण पथकाने रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांचे समुपदेशन करून तत्काळ प्रत्यारोपणाची प्रक्रिया सुरू केली. वैद्यकीय तज्ज्ञ, वाहतूक पोलिस प्रशासन, विमानतळ प्रशासन आणि कार्डिएक एअर अॅम्ब्युलन्स सेवा यांच्यातील उत्कृष्ट समन्वयामुळे महत्त्वाच्या कालमर्यादेत यकृत नाशिक येथे पोहोचवणे शक्य झाले आणि शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.

ही यशस्वी शस्त्रक्रिया अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलच्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, अनुभवी डॉक्टरांचे कौशल्य आणि उच्च दर्जाच्या आरोग्यसेवेचे प्रतीक ठरली आहे. तसेच, ही घटना अवयवदानाचे महत्त्व, ग्रीन कॉरिडॉरसारख्या विशेष वाहतूक व्यवस्थेची आवश्यकता आणि कार्डिएक एअर अॅम्ब्युलन्स सेवांची उपयुक्तता अधोरेखित करणारी आहे.

उत्तर महाराष्ट्रातील गंभीर यकृत आजाराने ग्रस्त रुग्णांसाठी ही कामगिरी आशेचा नवा किरण ठरली असून, प्रगत आरोग्यसेवा आता स्थानिक पातळीवर उपलब्ध होत असल्याचे हे ठोस उदाहरण आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे