अपघातकृषीवार्ताब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक
भाजप पदाधिकाऱ्याच्या द्राक्ष बागेत ट्रक घुसल्याने लाखोंचे नुकसान

0
3
2
1
2
3
विंचूर- येथील भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य संजय शेवाळे यांच्या काढणीला आलेल्या द्राक्ष बागेत सोळा टायर चा ट्रक घुसल्याने लाखोंचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.
याबाबत अधिक माहिती अशी की आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास लासलगाव कडून विंचूर कडे येणारा ट्रक क्र MH 15 JW 6044 जनार्दन स्वामी आश्रम च्या समोर असलेल्या द्राक्ष बागेत घुसला. त्यामुळे सुमारे 100 एक द्राक्ष झाडे भुई सपाट झाली. दोन दिवसात काढणीला आलेला बाग व्यापारी घेऊन जाणार होता. मात्र या द्राक्षांचे लाखोंचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. सदरचा ट्रक लासलगाव येथील रघुवीर भेळ भत्ता सेंटर चे संचालक शरद संतोष निकम यांचा असून ट्रक चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते.
या घटनेत वित्तहानी झाली असून जीवित हानी झाली नाही. याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी अपघातात तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. विंचूर लासलगाव रस्ता हा मृत्यूचा सापळा बनत चाललेला आहे. या रस्त्यावरील वाढती रहदारी लक्षात घेता लवकरात लवकर येथे चौपदरीकरणाचे काम सुरू करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पाच वर्षांपूर्वी उभा केलेल्या द्राक्ष बाग यापुढे सुमारे पंधरा ते वीस वर्ष उत्पन्न देणारा. बागेत घुसलेल्या या ट्रकमुळे एक एकर द्राक्ष बागेतील सुमारे 100 झाडे तसेच लोखंडी अँगलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करीत आहे.
– संजय नंदूकांत शेवाळे
– माजी पंचायत समिती सदस्य
0
3
2
1
2
3