Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरशैक्षणिक

डोंगरगाव जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण

0 3 3 0 4 4

डोंगरगाव जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण

हरित सेना सदस्यांनी केले शाळेच्या विविध उपक्रमांचे कौतुक

डोंगरगाव ता. निफाड येथील जिल्हा परिषद शाळेत पर्यावरण सप्ताह निमित्त शाळेच्या परिसरात विविध प्रकारच्या देशी प्रजातींच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

हरित सेनेने गेल्या दोन वर्षांपासून पंचक्रोशीत जवळपास साडे सातशे झाड लावले असुन दर शनिवारी एक तास देऊन ते त्या झाडांची नियमीत काळजी घेत असतात. त्यांचे हेच पर्यावरणाप्रती असलेले प्रेम, सातत्य पुर्ण अविरत सुरू असलेले कार्य विद्यार्थांना कळावे, तसे संस्कार विद्यार्थांवर व्हावे, या उदात्त उद्देशाने शाळेचे मुख्याध्यापक दिलीप कोथमिरे यांनी हरित सेनेला डोंगरगाव जिल्हा परिषद शाळेत येण्याचे आवाहन केले होते.

       अल्पावधीतच चळवळ स्वरूप धारण केलेल्या हरितसेनेच्या सदस्यांनी डोंगरगाव येथे उपस्थित राहुन मुलांचे आणि त्यांना सुशिक्षित करण्यासाठी झटणा-या उपक्रमशील शिक्षकांचे कौतुक केले. या भेटीचे स्मरण रहावे म्हणुन शाळेच्या परिसरात देशी प्रजातीच्या झाडांचे मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

      यावेळी बोलताना खरेदी-विक्री संघाचे चेअरमन, हरित सेना सदस्य शंतनू पाटील यांनी मुलांशी हितगुज साधले. ‘एक झाड माणसाला आयुष्यात काय काय देते? तसेच आपल्या जीवनात सुखाच्या राशी उभ्या करायच्या असतील तर पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे.’ हे सोप्या भाषेत मुलांना समजावून सांगितले. वनाधिकारी नवनाथ गांगोडे साहेब यांनी ‘एक पेड मा के नाम’ या शासन उपक्रमाची माहिती मुलांना दिली. त्यांनी आपल्या मनोगतात पर्यावरणाचे रक्षण केले, तरच भविष्यात माणसाचे अस्तित्व शिल्लक राहील. निसर्गाकडून ओरबडून घेण्यापेक्षा त्याच्यावर प्रेम केले तर तो निसर्ग माणसाला फक्त देतच राहतो, म्हणून आपण झाडे लावली पाहिजेत असे आवाहन करून त्यासाठी वनविभागाच्या वतीने सर्व सहकार्य करण्याची तसेच शासकीय योजनेतून मुलांची निसर्गसहल म्हणजे भटकंती आयोजित करण्याची त्यांनी घोषणा केली. प्रसिद्ध इतिहास अभ्यासक संजय बिरार यांनी मुलांना निसर्गाचे महत्त्व सांगितले आणि एक व्यक्ती ने जरी ठरवल तरी तो कसा बदल करू शकतो हे महावितरणाचे वरिष्ठ अधिकारी हरित सेना सदस्य दिनेश जोशी त्यांच्या एकट्याच्या प्रयत्नाने, वनाधिकारी गणगोडे यांच्या सहकार्याने नाशिक जिल्ह्यातील सर्व महावितरणाच्या कार्यालयात कसे वृक्षारोपण संपन्न झाले याचे उदाहरण दिले. तसेच पुन्हा एकदा शाळेला भेटण्यासाठी येईल हा शब्द त्यांनी दिला.

      शाळेत सुरू असणारी विद्यार्थी बचत बँक, विज्ञान प्रयोगशाळा, प्लास्टिक मुक्त शाळा, स्टार स्टुडन्ट, पुस्तकावर बोलू काही, माझी गोष्ट, आम्ही अधिकारी होणारच, आमचे भांडारगृह व सांकेतिक भाषेतून कल्पना विकास, उपस्थिती ध्वज या व अशा विविध अभिनव कल्पना शाळेत सुरू असल्याबद्दल मान्यवर पाहुण्यांनी सर्व शिक्षकांचे कौतुक केले.

      हरित सेनेने वृक्षारोपणाचा आणि त्यांच्या संगोपनाचा जो विडा उचलला आहे, त्यात जे सातत्य आहे त्यानिमित्त हरित सेनेच्या सदस्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

 यावेळी वनाधिकारी नवनाथ गांगोडे, सहाय्यक वनाधिकारी कल्पना पाईकराव, डोंगरगाव जिल्हा परिषद शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील आव्हाड, उपाध्यक्ष नारायण नागरे, शाळेचे मुख्याध्यापक दिलीप कोथमिरे, हरित सेनेचे शंतनू पाटील, राजेंन्द्र होळकर, संजय बिरार, ऋषिकेश जोशी, चंद्रशेखर शिंदे, पियुष भन्साळी, सुहास कोल्हे, अजय घनावत, शिक्षक रमेश जाधव, रेवती शिंदे, योगेश जगदाळे, सुनील मोरे मनीषा डेर्ले, हर्षा पाटील, संजना खैरनार, मयुरी आहेर आदींसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समिक्षा आव्हाड, ईश्वरी नागरे, शर्वरी आव्हाड यांनी केले. 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 3 0 4 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे