CID ची प्रसिद्ध टीम येणार इंडियन आयडॉल 15 मध्ये
CID ची प्रसिद्ध टीम येणार इंडियन आयडॉल 15 मध्ये: श्रेया घोषाल म्हणाली, “मी असे ऐकले आहे की, लता जींना CID आवडायचे!”
या वीकएंडला इंडियन आयडॉल सीझन 15 या अत्यंत लोकप्रिय गायन रियालिटी शोमध्ये ‘ख्रिसमस कॉन्सर्ट” हा विशेष भाग साजरा होणार आहे. या धमाल भागात बरेचसे मान्यवर ‘सिक्रेट सांता’ म्हणून सामील होणार आहेत. त्यात, मधुवंती बागची, पॅरडॉक्स, भूमी त्रिवेदी, ऋषभ शर्मा, पॅपॉन, निखिता गांधी, प्रियांक शर्मा, मेईयांग चॅंग आणि त्यांच्यासोबत CID ची लोकप्रिय टीम- ACP प्रद्युमन (शिवाजी साटम), सीनियर इंस्पेक्टर अभिजीत (आदित्य श्रीवास्तव) आणि सीनियर इंस्पेक्टर दया (दयानंद शेट्टी) देखील असणार आहेत.
‘आयडॉल का आशीर्वाद’ म्हटल्या जाणाऱ्या रागिणी शिंदेने आपल्याला CID शो खूपच आवडतो असे सांगितले. ती म्हणाली, “मी फक्त CID च बघते. मी सगळे एपिसोड बघितले आहेत. आणि अजून ते पुन्हा पुन्हा पाहते.” या शोमधले तिचे सगळ्यात आवडते पात्र कोणते या प्रश्नाचे उत्तर देताना ती म्हणाली, “तिघेही मला आवडतात, पण अभिजीत सर मला विशेष आवडतात.”
रागिणीचे कौतुक करताना शिवाजी साटम म्हणाले, “मी तुझे गाणे ऐकले आहे, आणि मी इतकेच म्हणेन की, ते अद्भुत आहे. सुंदर! तुझ्या आवाजात काही तरी दैवी असे आहे. मी आधीच दया आणि आदित्यला तुझ्याबद्दल सांगितले होते, की मी तिचे गाणे ऐकले आहे, जे खरोखर अद्वितीय आहे!”
श्रेया घोषाल म्हणाली, “मी असे ऐकले आहे की, लता जींना सुद्धा CID आवडायचे. तिने तुम्हाला (टीम CID) भेटून तसे सांगितलेही होते. अशाप्रकारे, लता जींपासून रागिणीच्या पिढीपर्यंत हे कनेक्शन आहे.”
शिवाजी साटम म्हणाले, “आमचे हेच तर म्हणणे आहे! CID आणि आम्हा सगळ्यांना सरस्वती मातेकडून आशीर्वाद मिळाला आहे.” परीक्षकांचे कौतुक करताना ते म्हणाले, “आम्ही खूप मोठे फॅन आहोत. आता आम्ही मागे होतो, तेव्हा हेच बोलत होतो. आपल्याला भेटण्यासाठी वेळ मिळत नाही, पण आम्ही हा शो बघतो. आणि एक दिवस आपण भेटू ही आशा असतेच.”
विशाल ददलानी म्हणाला, “आज मला किती आनंद झाला आहे, ते मी व्यक्त करू शकत नाही. तुम्ही आमच्या जीवनात आलात, त्याला सहा वर्षे झाली. या सहा वर्षांत मी लोकांकडून खूपदा हे ऐकले आहे की, “तुम्ही CID ची जागा घेतलीत, CID परत घेऊन या!” लोक तुमच्यासाठी वेडे आहेत. CID हा केवळ एक शो नाही, ती भारताची संस्कृती आहे.”
दयानंद शेट्टी रागिणीला उद्देशून म्हणाला, “तू अद्भुत गायलीस! सगळेजण म्हणाले, त्याप्रमाणे, तू ‘दरवाजा तोड परफॉर्मन्स’च्या ही पलीकडे गेलीस! तू आधीच दोन पावले पुढे आहेस. सरांनी मला तुझ्या निष्ठेबद्दल आणि इतक्या लहान वयात तू केलेल्या त्यागाबद्दल, तुझ्या संघर्षाबद्दल सांगितले. तू नक्कीच खूप पुढे जाशील आणि मोठी सिद्धी मिळवशील. अशीच प्रगती करत रहा आणि यश मिळवत रहा.”
त्यानंत दयाने तिच्याबद्दलच्या कौतुकाचे प्रतीक म्हणून तिला CID बॅज दिला.
बघा, या वीकएंडला इंडियन आयडॉल 15 रात्री 8.30 वाजता आणि CID रात्री 10.00 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!