Breaking
क्रिडा व मनोरंजन

‘धर्मवीर – 2’ 27 सप्टेंबरपासून जगभरात

0 1 5 1 2 1

जो हिंदू हित की बात करेगा,
वही देशपर राज करेगा!’

‘धर्मवीर – 2’ 27 सप्टेंबरपासून जगभरात

’जो हिंदू हित की बात करेगा, वही देशपर राज करेगा’ अशी थेट आणि स्पष्ट गर्जना करणारे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे पदर धर्मवीर – 2 या चित्रपटात उलगडणार आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरमुळे अंगावर अक्षरशः काटा येत असून 27 सप्टेंबरला धर्मवीर – 2 प्रदर्शित होण्याची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. धर्मवीर -2 या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे उमेश कुमार बन्सल आणि मंगेश देसाई यांनी केली आहे. तर लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावली आहे.

प्रसाद ओक, क्षितीश दाते यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाच्या या पूर्वी प्रदर्शित केलेल्या टीजर, ट्रेलरला तुफान प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाची गाणीही गाजत आहेत. त्यानंतर आता आणखी एक नवा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. ट्रेलरला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत असून हा चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये देशभरात प्रदर्शित केला जाणार आहे. संगीतकार चिनार महेश आणि अविनाश विश्वजित यांनी धर्मवीर -2 मधील गाण्यांचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. नव्या ट्रेलरमधून दिघेसाहेबांची विविध रुपं दाखवण्यात आली आहेत. सर्वसामान्यांसाठी झटणारे, अन्याय रोखणारे, महिलांना न्याय मिळवून देणारे, धर्मासाठी लढणारे दिघेसाहेब या गाण्यात दिसतात. त्याशिवाय हिंदुत्त्वाची गोष्ट उलगडण्यात आली आहे. त्यामुळे हिंदुत्त्वाविषयी थेट आणि आक्रमक भूमिका घेणारे साहेब यात दिसतात. म्हणूनच आता चित्रपटात काय कथानक उलगडणार याच कुतुहल निर्माण झाले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 5 1 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे