आरोग्य व शिक्षणशैक्षणिक
विंचूर येथे बाल वैज्ञानिकांचा मेळावा संपन्न

0
4
2
9
5
7
*विंचूर येथे बाल वैज्ञानिकांचा भव्य मेळावा संपन्न*
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ कला, विज्ञान महाविद्यालयात दि. 3 डिसेंबर २०२५ रोजी शालेय विज्ञान, गणित व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले.

कार्यक्रमाची सुरुवात नोबेल पारितोषिक विजेते भारतीय शास्त्रज्ञ सी व्ही रमण यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या ड्रोनच्या साहाय्याने प्रदर्शनाचे भव्य उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष जगदीश जेऊघाले अध्यक्ष सल्लागार समिती, डॉक्टर सुजित गुंजाळ सदस्य जनरल बॉडी, कैलास सोनवणे उपाध्यक्ष सल्लागार समिती व इतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, ज्याने उपस्थित सर्वांचेच कौतुक मिळवले.
प्राचार्य श्री. नंदकुमार देवढे यांनी प्रास्ताविकपर मनोगतात उपस्थित बाल वैज्ञानिकांना मार्गदर्शन करताना त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन दिले. तसेच विद्यालयातील एकूण 187 विज्ञान, गणित, एआय उपकरणांची मांडणी प्रदर्शनात मांडण्यात आल्याची व रांगोळी हस्तकला यांचे स्वतंत्र दालने प्रदर्शनासाठी सज्ज असल्याची सविस्तर माहिती दिली.
डॉ. सुजित गुंजाळ यांनी विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे भरभरून कौतुक केले आणि विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने संपूर्ण विद्यालय “प्लास्टिक मुक्त शाळा” बनवण्याचे आवाहन केले.
प्रमुख वक्ते उपमुख्याध्यापक श्री. सुरेश वाबळे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, “विज्ञान प्रदर्शन हा केवळ प्रकल्प स्पर्धेचा कार्यक्रम नसून भावी संशोधक घडवण्याची पायाभरणी आहे. यासाठी संशोधनाची वृत्ती आणि सतत प्रश्न विचारण्याची सवय अत्यंत आवश्यक आहे.”
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध विज्ञान, गणित व AI आधारित मॉडेल्सनी प्रेक्षकांना चकित केले. पर्यावरण, कृषी, आरोग्य, रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचे अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्प यात सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागला असून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाने पुन्हा एकदा आपली शैक्षणिक गुणवत्ता व बाल वैज्ञानिक घडवण्याची परंपरा जपली आहे, असे सर्वांनी मान्य केले.
अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील मुलेही जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकतील असा विश्वास यानिमित्त व्यक्त करण्यात आला.
सदर कार्यक्रमाप्रसंगी राजाभाऊ गोरे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, उपाध्यक्ष सोमनाथ निकम, पी के जेऊघाले, सुमन दरेकर, नानाभाऊ गाडे, राजेंद्र क्षीरसागर, संदीप जोशी, मालती जाधव, सोनाली कापडणीस, चव्हाण सर मुख्याध्यापक रुई विद्यालय, आनंदी दरेकर, जंगम मॅडम, आबासाहेब दरेकर, दत्ता सूर्यवंशी, योगेश चौधरी व पर्यवेक्षक सुदाम माळी,उच्च माध्यमिक विभागाचे एचओडी राजेंद्र टिळेकर, विविध शालेय समितीचे अध्यक्ष सदस्य, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक राजेंद्र चांदे लाईफ मेंबर व सावळे ए वाय यांनी केले व आभार शेख एम आय यांनी मानले.
0
4
2
9
5
7



