आरोग्य व शिक्षणब्रेकिंग
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथील प्रसिद्ध रोबोटिक नी सर्जन डॉ. जयेश सोनजे यांची 3000+ यशस्वी गुडघा शस्त्रक्रियांची उल्लेखनीय कामगिरी*

0
4
7
2
1
3
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथील प्रसिद्ध रोबोटिक नी सर्जन डॉ. जयेश सोनजे यांची 3000+ यशस्वी गुडघा शस्त्रक्रियांची उल्लेखनीय कामगिरी

नाशिक :
अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून गुडघा शस्त्रक्रियेत नवे मानदंड प्रस्थापित करणारे अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक येथील प्रसिद्ध रोबोटिक नी सर्जन डॉ. जयेश सोनजे यांनी 3000 पेक्षा अधिक यशस्वी गुडघा शस्त्रक्रिया पूर्ण करत आरोग्य क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.
रोबोटिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण्यात येणाऱ्या या शस्त्रक्रियांमुळे रुग्णांना अधिक अचूक, सुरक्षित आणि परिणामकारक उपचार मिळत आहेत. पारंपरिक शस्त्रक्रियेच्या तुलनेत रोबोटिक नी रिप्लेसमेंटमुळे वेदना आणि रक्तस्त्राव कमी होतो, तसेच रुग्णांना जलद पुनर्वसनाचा लाभ मिळून ते लवकर चालू लागतात.
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमधील अत्याधुनिक सुविधा, प्रगत ऑपरेशन थिएटर आणि अनुभवी वैद्यकीय टीमच्या सहाय्याने डॉ. सोनजे यांनी हजारो रुग्णांना पुन्हा वेदनामुक्त आणि सक्रिय जीवन मिळवून देण्यात यश मिळवले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे नाशिक आणि परिसरातील रुग्णांसाठी उच्च दर्जाची गुडघा उपचार सेवा अधिक सुलभ आणि उपलब्ध झाली आहे.
या यशाबद्दल बोलताना डॉ. जयेश सोनजे म्हणाले, “रुग्णांना सर्वोत्तम आणि अचूक उपचार देणे हेच आमचे ध्येय आहे. रोबोटिक तंत्रज्ञानामुळे आम्हाला अधिक विश्वासार्ह आणि दीर्घकालीन परिणाम साधता येतात, ज्यामुळे रुग्णांचे जीवनमान सुधारते.”
सांधेरोपण शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी पेशंट्स मुंबई, पुणेच नाही तर इतर राज्यातूनही नाशिक मध्ये डॉक्टर जयेश सोनजे सरांकडे येतात. अल्प दरात असेच उत्कृष्ट रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी आता नाशिक अशोका Medicover एक सर्वोत्तम पर्याय बनला आहे.
डॉ. सोनजे यांच्या या उल्लेखनीय योगदानाबद्दल वैद्यकीय क्षेत्रातून तसेच समाजातील विविध स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे. अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल भविष्यातही अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रुग्णांना उच्च दर्जाची आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध आहे.
0
4
7
2
1
3



