कृषीवार्तासत्कारसामाजिक
रोहिणी निकम “कृषी गौरव” पुरस्काराने सन्मानित

0
2
5
6
2
9
रोहिणी निकम “कृषी गौरव” पुरस्काराने सन्मानित
कृषी उद्योग व विस्तार कार्याबद्दल सन्मान
इगतपुरी ( प्रतिनिधी )
नाशिक येथील ॲग्रोकेअर कृषीमंच संस्थेच्या संचालिका तसेच कृषीभूषण महाराष्ट्र एफ पी ओ स्टार्टअप फेडरेशनच्या संचालिका रोहिणी भूषण निकम यांना “इच्छापूर्ती प्रतिष्ठान” या संस्थेचा २०२५ या वर्षाचा कृषी विस्तार या विभागातून “कृषी गौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे वितरण लहवित येथे कृषिरत्न आबासाहेब मोरे व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जगदीश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजक गणेश निसाळ, कृषी उद्योजक भूषण निकम, सचिन वाघ आदी मान्यवर उपस्थित होते. रोहिणी पाटील यांचे शिक्षण एम कॉम झाले असून २०१५ पासून ते ऍग्रो केअर कृषीमंच या कृषी क्षेत्रात नावाजलेल्या संस्थेच्या संचालिका आहेत, संस्थेच्या माध्यमातून विविध कृषी विस्ताराची कार्य ते करत असतात त्यामध्ये शेतकरी कार्यशाळा कृषी प्रदर्शन, विविध कृषी विषयक चर्चासत्रे, सेमिनार वेबिनार च्या माध्यमातून कृषी विस्ताराचे काम ते करतात. संस्थेच्या माध्यमातून विविध पुरस्कार वितरण कार्यक्रमाची देखील त्यांची यशस्वी आयोजन ते करतात. तसेच कृषीभूषण फेडरेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये शेतकरी उत्पादक कंपनीच्या निर्मितीसाठी व नोंदणीकृत संस्थांना क्षमता विकासावरती त्यांचे काम नियमित चालू असते. या सर्व कामासाठी त्यांना कृषी उद्योजक बिजनेस कोच भूषण निकम यांची मोलाची साथ व मार्गदर्शन आहे. त्यांना प्राप्त झालेल्या पुरस्कारामुळे सर्व स्तरावरून त्यांचे अभिनंदन होत आहे.
0
2
5
6
2
9