Breaking
क्रिडा व मनोरंजननिवडब्रेकिंगसत्कारसामाजिक

नलिनी कड यांनी जिद्दीने केले मुंबई मॅरेथॉन सहभागाचे स्वप्न पूर्ण 

0 4 2 9 5 7

नलिनी कड यांनी जिद्दीने केले

मुंबई मॅरेथॉन सहभागाचे स्वप्न पूर्ण 

नाशिक ( प्रतिनिधी ) येथील योगशिक्षिका, सायकलीस्ट, सामाजिक कार्यकर्त्या नलिनी कड यांनी मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. वयाच्या ५३ वर्षी ४२ किलोमीटर अंतर जिद्दीने धावून त्यांनी व्यायामाचे महत्त्व, पर्यावरण रक्षण, महिला सुरक्षा, देशभक्ती यांचा संदेश दिला.

रविवारी दि.१८ जानेवारी रोजी २१ व्या टाटा मुंबई मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. नाशिकच्या नलिनी कड यांचे त्यात सहभागी होण्याचे अनेक वर्षांचे स्वप्न होते. ते त्यांनी यंदा जिद्दीने पूर्ण केले. कोस्टल रोड, वांद्रे सी – लिंक अशा अवघड मार्गावर धावताना त्यांनी जनजागृती करण्याचे काम केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड हे त्यांचे पती आहेत. त्यांच्यासह मुले नयन आणि मयंक यांनी प्रोत्साहन दिले. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी आव्हान स्वीकारले व निर्धारित वेळेत ते पूर्ण केले. पहाटे ५ वाजता धावण्यास प्रारंभ झाला. मार्गावरील मरीन ड्राईव्ह, गेट वे ऑफ इंडिया, महालक्ष्मी मंदिर, हाजीअली, सिद्धिविनायक गणपती यांचे सान्निध्य त्यांना लाभले. 

  नाशिकला परतल्यावर आनंद व्यक्त करताना त्यांनी या यशाचे श्रेय नाशिकला दिले. नाशिकनेच आपल्याला आव्हाने स्वीकारून त्यावर मात करण्यास शिकविले. नियमित योगसाधना, सायकलींगचा सराव, मित्रमैत्रिणींचा नैतिक आधार यामुळेच यंदा देश – परदेशातील ६९ हजार धावपटूंच्या समवेत टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होता आले. हा अपूर्व, अविस्मरणीय अनुभव घेता आला. यावेळी नाशिकची आंतरराष्ट्रीय धावपटू संजीवनी जाधव हिने यश मिळवले. तिला भेटून नाशिककरांतर्फे अभिनंदन करता आले. या मॅरेथॉनमध्ये ५३ कोटींचे निधी संकलन झाले. याबद्दल समाधान मानून हा अनुभव पुढील वाटचालीस आधारभूत ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे