Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांचं वयाच्या 84 व्या वर्षी निधन

0 1 5 1 2 0

नाशिक /किरण घायदार

माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रेन स्ट्रोक आल्यानं नाशिक येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मधुकर पिचड यांनी अनेक महत्त्वाची राजकीय पदं सांभाळली आहेत. आदिवासी समाजातील कार्यकर्ते आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज्य सरकारमध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणूनही अनेक वर्षे काम केलं आहे. मधुकर पिचड यांनी १९८० ते २००९ पर्यंत नगर जिल्ह्यातील (आताचा अहिल्यानगर) अकोले विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं. तर मार्च १९९५ ते जुलै १९९९ या काळात ते विधानसभेत विरोधी पक्षनेते होते.

मधुकर पिचड यांचा राजकीय प्रवास : सुरुवातीच्या काळात शरद पवार यांचे खंदे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून त्यांची खरी राजकीय ओळख. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. परंतु 2019 मध्ये त्यांनी त्यांचा मुलगा वैभव पिचड यांच्यासह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मधुकर पिचड यांनी सहकार क्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे. अमृतसागर दूध सहकारी संस्था अकोले त्यांनी स्थापना केली. तसंच अगस्ती सहकारी साखर कारखान्याची स्थापना करुन संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. सुरुवातीला सत्तरच्या दशकात जिल्हा परिषद सदस्य म्हणून आणि नंतर पंचायत समिती अकोले तालुका अध्यक्ष म्हणून निवडून आल्यापासून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही.

आदिवासी कुटुंबात जन्म : मदुकर पिचड यांचा जन्म 1 जून 1941 रोजी महादेव कोळी या आदिवासी कुटुंबात झाला. त्यांचे वडील काशिनाथ पिचड हे एक शिक्षक होते. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी बी ए एल एल बी करुन वकिलीची शिक्षण पूर्ण केलं. विद्यार्थी असतानाच त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 5 1 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे