शुभ्राचे खोटं होणार का उघड? पाहा कलर्स मराठीवरील ‘अबीर गुलाल’ मालिका
शुभ्राचे खोटं होणार का उघड? पाहा कलर्स मराठीवरील ‘अबीर गुलाल’ मालिका
पाहा – ‘ अबीर गुलाल ‘ दररोज रात्री ८ :३० वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर आणि कधीही @officialjiocinema वर.
प्रेक्षकांच्या विशेष प्रेमात उतरलेली कलर्स मराठीवरील ‘अबीर गुलाल’ मालिका एकापेक्षा एक उत्कंठावर्धक वळणांनी सजली आहे. गेल्या काही भागात प्रेक्षकांनी अगस्त्यचे अपहरण झालेले पाहिले आणि त्यानंतर श्रीने तीच्या जीवाची परवा न करता अगस्तचे प्राण वाचवले.
श्रीने विशालसोबत व्यवहार करताना शुभ्राला रंगेहात पकडले. श्रीच्या या निर्णायक कृतीने शुभ्राच्या खोट्या चेहऱ्याला आव्हान मिळाले आहे. शुभ्रा श्रीची माफी मागते परंतु श्री तिच्या कपटाच्या खेळाने थक्क झाली आहे. श्रीने स्पष्ट शब्दांत शुभ्राला इशारा दिला आहे की, तिचे खरे सत्य आता सगळ्यांसमोर उघड करणार आहे.
या नाट्यमय मोडावर पुढे काय घडणार आणि श्री कशाप्रकारे शुभ्राला सामोरी जाणार? हे पाहण्याची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.