Breaking
क्रिडा व मनोरंजन

अभिनेत्री खुशी दुबे म्हणते, “शिवांगीचा प्रवास माझ्या स्वप्नांशी मिळताजुळता आहे”

‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’

0 3 2 1 2 4

‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेतील मुख्य व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री खुशी दुबे म्हणते, “शिवांगीचा प्रवास माझ्या स्वप्नांशी मिळताजुळता आहे”

भारतीय चित्रपटसृष्टीच्या पार्श्वभूमीवरील ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ ही मालिका सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनची एक नवी कोरी मालिका आहे, जी आपल्या कुटुंबाच्या ‘संगम सिनेमा’ या सिंगल- स्क्रीन थिएटरचे पूर्वीचे वैभव पुन्हा मिळवण्याची आकांक्षा उराशी बाळगणार्‍या, शिवांगी सावंतच्या जीवनावर आधारित आहे. अनेक अडथळे पार करत ती मुंबई गाठते आणि अचानक सुपरस्टार अयान ग्रोव्हर उर्फ AGशी तिची भेट होते, ज्याचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. एका थेट संभाषणात, खुशी दुबे आपल्या शिवांगी या व्यक्तिरेखेबद्दल, मालिकेच्या तयारीबद्दल आणि इतर विषयांवर बोलत आहे –

1.आम्हाला तुझ्या शिवांगी सावंत या व्यक्तिरेखेबद्दल सांगू शकशील? या भूमिकेकडे तू कशी आकर्षित झालीस?

मी पहिल्यांदा पटकथा ऐकली तेव्हाच मला जाणवले की शिवांगी ही व्यक्तिरेखा अनेकांना आपल्यासारखी वाटू शकते. मला वाटते, माझ्या दैनंदिन आयुष्यात देखील मी हुबेहूब तिच्यासारखी आहे. ती उत्साही, धाडसी, नम्र आहे आणि आधुनिक काळाच्या संवेदना तिच्यात आहेत. ती आपल्या वडीलांचा वारसा जतन करून, त्यांच्या ‘संगम सिनेमा’ या सिंगल- स्क्रीन थिएटरचे पूर्वीचे वैभव पुन्हा मिळवण्याची आकांक्षा बाळगते.

2. शिवांगीची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी कशाप्रकारे तयारी केलीस?

माझी व्यक्तिरेखा चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, शूटिंग सुरू होण्यापूर्वी मी बऱ्याचदा निर्माते आणि लेखकांची भेट घेतली आणि त्यांच्याशी सविस्तर बोलले. माझी व्यक्तिरेखा मराठी मुलीची आहे हे लक्षात घेऊन माझी भूमिका हुबेहूब साकारण्यासाठी मला माझ्या मराठी उच्चारांवर काम करावे लागले. या प्रवासात मला माझ्या आईची भूमिका साकारणार्‍या आसावरी जोशी जीं नी खूप मदत केली, त्यांनी भाषेतील बारकावे समजावून दिले. मालिकेत शिवांगीकडे रिक्षा असल्यामुळे मी रिक्षा चालवणेदेखील शिकून घेतले. पाण्यातली आणि आगीतली काही दृश्ये मला करायची होती, ज्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती आणि लवचिकता गरजेची होती. त्यामुळे माझा फिटनेस सांभाळण्यासाठी मी योग आणि डान्स करते कारण जिमला जाण्यासाठी मला वेळ मिळत नाही. पडद्यावर शिवांगीची भूमिका साकारण्यासाठी मी खूपच मेहनत घेतली.

3. तुझ्या मते, तू आणि शिवांगी या तुझ्या व्यक्तिरेखेत काय साम्य अथवा फरक आहे?

मी माझ्या व्यक्तिरेखेशी मिळतीजुळती आहे. शिवांगीचा काही बाबतीतला दृष्टीकोन माझ्या विचार प्रणालीशी जुळतो. ती ज्या प्रकारे आईच्या बाजूने उभी राहते, तिची निष्ठा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिचा आशावाद माझ्याशी जुळतो. एक खास समानता म्हणजे सिनेमाबद्द्लचे आमचे प्रेम. शिवांगी सारखीच मी देखील ‘फिल्मी किडा’ आहे आणि मला अभिनयाची प्रचंड आवड आहे. केवळ एक फरक म्हणजे चित्रपट व्यवसायातला आमचा अनुभव. शिवांगी चित्रपट उद्योगात नवीन आलेली आहे, तर मी चार वर्षांची असल्यापासून या क्षेत्रात काम करत आहे.

4. सहकलाकर अभिषेक बजाज सोबत तुझी पडद्याच्या मागे मैत्री कशी आहे?

माझ्या सगळ्याच सहकलाकारांसोबत काम करण्याचा माझा अनुभव खूपच चांगला आहे, खास करून अभिषेक सोबत. तो तर अफलातून आहे. तो कायमच त्याच्या व्यक्तिरेखेमध्ये रममाण असतो आणि मला सारखाच चिडवत असतो. महत्त्वाचे म्हणजे इतका अनुभवी असूनदेखील तो अतिशय नम्र असतो आणि संपूर्ण शूटमध्ये खूप मदत करतो. तो पक्का पंजाबी आहे आणि सतत पंजाबी गाणी ऐकत असतो आणि वातावरण उत्साही ठेवतो. कधीकधी तो मला दीपू अशी हाक मारतो कारण त्याच्या आईने मालिकेचे पोस्टर बघितल्यावर त्याला सांगितले होते की मी दीपिका पादुकोण सारखी दिसते. त्याच्यासोबत काम करायला मजा येते, तो चांगला सहकलाकार आहे आणि महत्त्वाचे म्हणजे सेटवर सकारात्मक ऊर्जा पसरवतो. त्याबद्दल मी त्याची आभारी आहे. मला आशा आहे की आमच्या मेहनतीचे फळ आम्हाला मिळेल आणि प्रेक्षकांना आमची पडद्यावरील केमिस्ट्री आवडेल.

5. तू या मनोरंजन क्षेत्रात खूप काळापासून आहेस, तुझा आत्तापर्यंतचा प्रवास कसा होता?

मी फार लहान वयात माझ्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि गेल्या काही वर्षांमध्ये, मला विविध प्रोजेक्टसमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे, जेणेकरून एक अभिनेत्री म्हणून पुढे येण्यास खूप मदत झाली आहे. व्यक्तिरेखा जिवंतपणे साकारण्यासाठी केवळ घोकंपट्टी उपयोगाची नाही तर यात भावनांचे प्रामाणिक आणि विश्वसनीय वाटेल असे चित्रण करण्याची सखोल वचनबद्धता अपेक्षित असते. आपल्यासमोर वैयक्तिक आव्हाने असली तरी, पूर्ण निष्ठा आणि विश्वासाने सादरीकरण करणे आवश्यक आहे. प्रत्येक प्रोजेक्ट आपल्याला नवीन अनुभव देतो आणि माझ्या वाटचालीत मिळालेल्या अशा संधींबद्दल मी कृतज्ञ आहे.

6. आगामी कथानकात प्रेक्षकांना काय बघायला मिळेल, हे सांगू शकशील का?

शिवांगीच्या नशीबाने तिला मुंबईत कसे आणले आणि तिची सुपरस्टार अयान ग्रोव्हर सोबत भेट कशी घडवली हे प्रेक्षकांनी बघितले आहे. आगामी भागांमध्ये शिवांगीचा प्रवास आणखी रोमांचक आणि अनपेक्षित वळण घेणार आहे. संगम सिनेमाला पुनरुज्जीवित करण्याचा तिचा प्रयत्न सुरू असताना तिच्या दृढनिश्चयाची आणि लवचिकतेची कसोटी पाहणार्‍या नवीन आव्हानांना तिला सामोरे जावे लागेल. AG सोबतच्या तिच्या नात्यामध्ये अनेक चढ उतार असतील आणि प्रेक्षकांचे मनोरंजन होईल असे बरेच काही मालिकेत आहे. तसेच काही वेळा प्रेक्षक हेलावून जातील.

तुझ्या चाहत्यांसाठी काही संदेश?
त्यांच्यासाठी ‘चाहते’ हा शब्द खूप छोटा आहे, खरं तर आमच्या आयुष्यात ते खूप मोठी भूमिका बजावतात, त्याला तोड नाही. आमच्यासाठी तसेच या उद्योगातील लोकांसाठी त्याचे खूप मोल आहे, आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येकजण आपापल्या जीवनात गुंतलेला असतो, मग ते कुटुंब असो, मित्र असो किंवा इतर जबाबदर्‍या असोत. तरीही, ते ज्यांना ओळखतही नाहीत त्यांच्यासाठी वेळ काढतात. निरंतर दिलेला पाठिंबा आणि माझ्यावर दाखवलेला विश्वास याबद्दल मला माझ्या सर्व चाहत्यांना धन्यवाद द्यायचे आहेत, अशीच कृपादृष्टी राहू दे आणि बघत रहा ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’.

बघत रहा, ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत. शिद्दत. मोहब्बत’ दर सोमवार ते शुक्रवार रात्री 8.00 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे