ब्रेकिंग
भरधाव वेगात असलेल्या कारची धडक, पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू, 11 गंभीर

0
5
2
0
4
4
भरधाव वेगात असलेल्या कारची धडक, पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू, 11 गंभीर
सप्तश्रृंगी गडाच्या पायथ्याशी भीषण अपघात, भरधाव कारची पोलिसांसह भाविकांना जोरदार धडक, पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू ; तर 11 हून अधिक जण जखमी
आज मध्यरात्री नंतर दोन वाजेच्या सुमारास सप्तश्रुंगी गडाच्या पायथ्याशी अत्यंत दुर्दैवी घटना घडली.
नाशिक जिल्ह्यातील नांदुरी येथे भरधाव कारची बंदोबस्तावरील पोलिसांना जोरदार धडक दिली. वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक विजय गायकवाड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर 11 हुन अधिक पोलीस अधिकारी, कर्मचार्यांसह भाविकही या धडकेत गंभीर जखमी झाले. नांदुरीच्या अभोणा चौफुलीवरील ही घटना घडली. जखमींवर वणी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर गंभीर जखमींना नाशिकला उपचारासाठी हलविलण्यात आले आहे. नवरात्रोत्सवानिमित्त नांदुरी गावात मोठ्या प्रमाणात बॅरेकेटींग करण्यात आले आहे.
0
5
2
0
4
4

