0
4
2
9
5
7
दिंडोरी वणी रस्त्यावर बालाजी नर्सरी परिसरात अल्टो कारला अपघात झाल्याचे दुर्दैवी घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. हा अपघात इतका भीषण होता की कार मधील सात जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन पुरुष तीन महिला व दोन वर्षे बालकाचा समावेश आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोशिंबीर देवठाण व सारसाळे येथील गांगुर्डे जाधव वाघमारे हे तीन कुटुंबीय नातेवाईकांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त अल्टो कार क्रमांक एम एच 04 डी वाय 6642 ने नाशिक येथे गेले होते. वाढदिवस कार्यक्रम आटोपून ते घरी परतत असताना, दिंडोरी वनी रस्त्यावरील बालाजी नर्सरी व बाजार समिती आवारासमोरून येणारी मोटरसायकल व अल्टो कार ची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात अल्टो कार रस्त्याच्या बाजूला नाल्यात जाऊन पलटी मारली. या नाल्यामध्ये पाणी असल्याने कार मधून महिला व पुरुषांना बाहेर निघता आले नाही परिणामी त्यांच्या नाकात तोंडात पाणी गेल्याने त्यांचा कार मध्ये गुदमरून बुडून मृत्यू झाला. तर मोटर सायकलस्वार मंगेश यशवंत कुरघडे 25 व अजय जगन्नाथ गोंद 18 राहणार नडगे गोट तालुका जव्हार जिल्हा पालघर सध्या मुक्काम पिंपळगाव बहुला सातपूर हे जखमी झाले असून त्यांना नाशिक येथील रुग्णालयात दाखल केले आहे.
घटनास्थळी नाशिकचे पोलीस उपाधीक्षक आदित्य मिलखेलकर जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलीस उपाधीक्षक मीरा आदमाने, प्रादेशिक परिवहन चे प्रदीप शिंदे यांनी पाहणी केली.
पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहेत.
अपघातातील मृतांची नावे –
देविदास पंडित गांगुर्डे वय 28 राहणार सरसाळे तालुका दिंडोरी,
मनीषा देविदास गांगुर्डे वय 23 राहणार सारसाळे तालुका दिंडोरी,
उत्तम एकनाथ जाधव वय 42 राहणार कोशिंबे तालुका दिंडोरी,
अलका उत्तम जाधव वय 38 राहणार कोशिंबे
दत्तात्रेय नामदेव वाघमारे वय 45 राहणार देवपूर देवठाण तालुका दिंडोरी,
अनुसया दत्तात्रेय वाघमारे वय 40 राहणार देवपूर देवठाण
भावेश देविदास गांगुर्डे वय दोन वर्ष राहणार सरसाळे तालुका दिंडोरी
0
4
2
9
5
7


