Breaking
क्रिडा व मनोरंजन

‘ज्युबिली टॉकीज’ मालिकेत ईराचा खोटारडेपणा उघडकीस आल्यामुळे नाट्य रंगले

0 1 5 1 2 1

‘ज्युबिली टॉकीज’ मालिकेत ईराचा खोटारडेपणा उघडकीस आल्यामुळे नाट्य रंगले

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ मालिकेत आता शिवांगी (खुशी दुबे) आणि ईरा (क्रिसन बॅरेटो) यांच्यातील वैर आणखी तीव्र होत आहे आणि त्याबरोबर मालिकेतली उत्कंठा देखील वाढत चालली आहे. पण अयान ग्रोव्हर म्हणजे AG (अभिषेक बजाज) चा शिवांगीवर असलेला अढळ विश्वास ईराच्या योजना उधळून लावेल. त्यामुळे ईराला त्या दोघांच्या वाढत्या जवळिकीबाबत आणखी द्वेष वाटू लागेल.

या आठवड्यात ईरा गोल्डी मामाला ब्लॅकमेल करून आगामी चित्रपटात AG ची नायिका म्हणून तिला घेण्याचा आग्रह धरते. दुसरीकडे, AG ईराला लग्नाची मागणी घालण्याचा विचार करत आहे, तर शिवांगी AG बद्दलच्या आपल्या मनातील अपरिचित भावनांमुळे गोंधळात पडली आहे. ईराने शिवांगीला 24 तासांच्या आत AG च्या जीवनातून निघून जाण्याची ताकीद दिली आहे, पण इतक्यात, शिवांगीला ईराचे मामाशी संगनमत असल्याचे समजते आणि ती ईराला AG समोर सत्य कबूल करायला सांगते. ताराच्या पार्टीत ईराचा खोटारडेपणा सगळ्यांसमोर उघडकीस येतो, तेव्हा मात्र अचानक एक नाट्यमय कलाटणी मिळते.

लिंक: https://www.instagram.com/reel/C-4ipJCq-2d/?igsh=dTN1dndxMzNrbGN

अयान ग्रोव्हर म्हणजे AG या एका मोहक सुपरस्टारची भूमिका करत असलेला अभिषेक बजाज, मालिकेतील वाढत्या नाट्याबद्दल उत्साहाने सांगतो, “ईराच्या कारस्थानांमुळे मालिकेच्या कथानकाला एक अनपेक्षित वळण मिळाले आहे. तिच्या प्रेमात आकंठ बुडालेला AG ईराची नकारात्मक बाजू बघू शकत नाही आणि इतर लोकांनी त्याला ती बाजू दाखवली, तरी तो त्याकडे दुर्लक्ष करतो. इतके की, त्याला शिवांगीचे देखील पटत नाही, जी त्याचे भलेच चिंतणारी आहे. पण, सत्य कधी ना कधी तरी पुढे येतेच. आगामी भागांमध्ये हेच प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. प्रेक्षकांना रोमांचक अनुभव मिळणार आहे, कारण ईरा आणि शिवांगी यांच्यातील संघर्ष पराकोटीला पोहोचला आहे. प्रेक्षकांची नजर नक्कीच पडद्यावर खिळून राहील!”

बघा ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत.शिद्दत.मोहब्बत’ दर सोमवार ते शुक्रवार रात्री 8:00 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 5 1 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे