Breaking
गुन्हेगारी

विष्णु भागवत यांचे अपहरण करून खंडणी मागणाऱ्या संशयित गुन्हेगारास अटक

गुंडा विरोधी पथकाने केले जेरबंद

0 3 2 1 2 3

नाशिक – 
फिर्यादी रुपचंद रामचंद्र भागवत व त्यांचा भाऊ विष्णु भागवत यांना जुने सीबीएस नाशिक येथुन राकेश सोनार व ५ अनोळखी इसम यांनी फिर्यादी रुपचंद भागवत व भाऊ विष्णु भागवत यांना बळजबरीने गाडीमध्ये डांबुन ४ कोटी १० लाख रुपये खंडणी उकळण्यासाठी अपहरण करुन त्रबकेश्वर, वाडीवरे, मुंबई रोड अशा वेगवेगळया ठिकाणी घेवुन जाऊन खंडणी न दिल्यास जिवे मारण्याची धमकी देवुन मागीतलेल्या स्क्कमेतील २ कोटी १० लाख रुपयांची तात्काळ व्यवस्था करण्यासाठी फिर्यादी यांना सोडुन फिर्यादी यांचा भाऊ विष्णु भागवत याचे अपहरण करुन घेवुन गेले म्हणून सरकारवाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्हयातील आरोपीताचा शोध घेत असतांना गुंडा विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार अक्षय गांगुर्डे व गणेश भागवत हे नाशिकरोड परिसरात गस्त करीत असतांना त्यांना माहिती मिळाली की सहराईत गुन्हेगार राकेश सोनार हा गुन्हा घडल्यापासुन मध्यप्रदेश व मुंबई, पुणे या भागात आपले अस्तित्व लपवुन फिरत असुन सध्या तो पुणे परिसरात जुन्या गाड्या खारेदी-विक्रीचा व्यवसाय करतो.

गुंडा विरोधी पथकाने पिंपरी चिंचवड, पुणे येथील हिंजवडी परिसरात जावुन जुन्या गाडया खरेदी-विक्री करणारे व गॅरेज काम करणारे इसम यांचेकडे चौकशी करून आरोपी राकेश सोनार हा सुसगाव, हिंजवडी येथे भाडोत्री राहत असल्याची माहिती काढली असता सुसगाव येथील स्थानिक लोक व बातमीदार यांचेकडुन भाडोत्री राहणारे इसमांनी माहिती घेवुन तांत्रिक व मानवी कौशल्य वापरुन दि.१९ जुलै २०२४ रोजी श्री समर्थ कृपा बंगला, भगवती नगर, सुसगाव, हिंजवडी पुणे येथुन आरोपी राकेश सोनार वथ-३१ वर्षे यास शिताफीने ताब्यात घेवुन नाशिक येथे आनुन पुढील तपासकामी सरकारवाडा पोलीस स्टेशन, नाशिक शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर, प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त (गुन्हे),. संदिप मिटके, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाने सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार विजय सुर्यवंशी, डी. के. पवार, प्रदिप ठाकरे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, प्रविण चव्हाण, मलंग गुंजाळ, राजेश सावकार, सुनिल आडके, निवृत्ती माळी, सुवर्णा गायकवाड, मनिषा कांबळे अशांनी केली आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे