Breaking
शासकीय

विणकरांना शासकीय नोंदणीतून मिळणार नवीन ओळख व योजनांचा लाभ : मंत्री छगन भुजबळ

येवल्यात विणकर सर्वेक्षणास सुरवात

0 1 5 1 2 1
नाशिक, दिनांक : 18 ऑगस्ट 2024 (जिमाका वृत्तसेवा):    येवला शहरात  विणकर सर्वेक्षणास सुरुवात झाली असून या सर्वेक्षणातून विणकरांची शासकीय नोंदणीद्वारे ओळखपत्र प्राप्त होणार  असून याद्वारे  सर्व घटकांतील विणकारांना शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे. हे सर्वेक्षण करतांना यातून कोणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी अशा सूचना राज्याच अन्न  नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.
आज येवला शहरात विणकर सर्वेक्षणबाबत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी यावेळी राजेश भांडगे, पप्पू सस्कर, मनोज दिवटे, शंभाशेठ लक्कडकोट, मयूर मेघराज, मकरंद सोनवणे, प्रवीण पहिलवान, अविनाश कुक्कर, केशव भांडगे, रमेश भावसार, गोविंदसा वाडेकर यांच्यासह विणकर बांधव उपस्थित होते.
मंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले, राज्यात शेती व्यवसायानंतर विणकर व्यवसाय हा दुसऱ्या स्थानावर आहे. येवल्यातील विणकरांच्या सर्वेक्षणास  ८ ऑगस्ट २०२४ पासून सुरुवात झाली आहे. या सर्वेक्षणातून सर्व विणकर बांधवांची नोंदणी होणार असून  शासकीय ओळखपत्र मिळणार आहे. आपर्यत तालुक्यातील ३० ते ४० गावांतून जवळपास ३ हजार विणकरांची नोंदणी सर्वेक्षणातून झाली आहे. आजपासून येवला शहरातील विणकारांच्या नोंदणीला सुरुवात करण्यात आली आहे.सुरुवातीला एका पथकाच्या मार्फत नोंदणी चालू होती मात्र गणेशोत्सवाच्या आत नोंदणी होऊन विणकारांना लाभ मिळावा यासाठी वस्त्रोद्योग आयुक्तांसोबत संपर्क साधून पाच पथकांमार्फत हे सर्वेक्षणाचे काम सुरू केले असल्याचे त्यांनी सांगितले.
येवल्यातील अनेक विणकर बांधवांकडे केंद्र शासनाचे ओळखपत्र नसल्याने त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. मंत्री छगन भुजबळ यांनी विणकर बांधवांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी त्यांची नोंदणी होऊन त्यांना ओळखपत्र मिळण्यासाठी राज्याचे वस्त्रउद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांचेसोबत चर्चा केली होती तर वस्त्रउद्योग आयुक्तांना येवल्यातील विणकरांची नोंदणी आणि ओळखपत्राबाबत सूचना केल्या होत्या.त्यानुसार विणकर बांधवांच्या सर्वेक्षणासाठी सुरुवात करण्यात आली आहे. तसेच याबाबतचा शासन निर्णय जारी झाला असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
या सर्वेक्षणात विणकाम व्यतिरिक्त पैठणी साडी तयार करण्यासाठी मदतनीस म्हणून काम करतात त्यात रेशीम कळ्या उखलन्याचे काम करणारे कारागीर,कांड्या, काकडे भरणारे, चिवट्या करणारे, सांधणी करणारे, रंगणी करणारे व त्या कामात मदत करणारे कारागीर या सर्वांची नोंदणी होऊन त्यांना देखील विणकर ओळख मिळणार आहे. वस्त्रोद्योग विभागाकडे सुरू करण्यात आलेले विणकर सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर या विणकर बांधवांना शासकीय ओळखपत्र देण्यात येणार आहे. त्यानंतर विणकर बांधवांना सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे. यामध्ये २०० युनिट पर्यंत मोफत वीज, उत्सव भत्ता, रेशीम खरेदीवर १५ टक्के राज्य सरकार व १५ टक्के केंद्र सरकारकडून सूट यासह विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे.
लाडक्या बहिणींनी मंत्री छगन भुजबळ यांना बांधल्या राख्या
महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर या योजनेचा पहिले  दोन महिन्यांचे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून येवला मतदारसंघांतील सुमारे ५३ हजार महिलांना लाभ मिळाला आहे. आज येवला दौऱ्यावर असताना विणकर सर्वेक्षण कार्यक्रम प्रसंगी महिलांनी मंत्री छगन भुजबळ यांना राखी बांधत आभार मानले.
000000
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 5 1 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे