Breaking
महाराष्ट्रसामाजिक

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा लासलगावी नागरी सत्कार

0 1 5 7 0 3

शेतकरी हा राज्याचा नव्हे तर देशाचा कणा आहे : कृषी मंत्री ना.माणिकराव कोकाटे 

 “लासलगावात पहिला नागरी सत्कार म्हणजे प्रेमाचे, सलोख्याचे संबंध व ऋणानुबंध “

शरद लोहकरे,लासलगाव 

लासलगाव येथे नवनिर्वाचित कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा नागरी सत्कार संपन्न झाला. यावेळी सौ वेदिकाताई होळकर यांनी औक्षण करून कृषीमंत्री ना. माणिकराव कोकाटे यांचे स्वागत केले. यावेळी मंचावर नवनिर्वाचित कृषिमंत्री ना.ॲड. माणिकराव कोकाटे यांचे समवेत ज्येष्ठ नेते अशोकनाना होळकर, राजेंद्र डोखळे, जयदत्त होळकर, बाळासाहेब क्षिरसागर, कैलास भोसले, अफजल शेख, राहुल शेजवळ, ललित दरेकर, गुणवंत होळकर, मुकुंद होळकर, जगदीश होळकर, नंदकिशोर डागा , भीमराव काळे, प्रवीण कदम, गुणवंत होळकर, तानाजी बनकर, अशोक मानकर, डॉ. सुजित गुंजाळ आदी मान्यवर उवस्थित होते. तसेच या नागरी सत्कार समारंभासाठी परिसरातील गावातून सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी, शेतकरी नेते, विविध धार्मिक संघटना, मित्रमंडळ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 सत्कार सोहळा प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत असतांना शेतकऱ्यांना आपल्याकडून मोठी अपेक्षा असून शेतीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तूंवरील जिएसटी, इतर टॅक्स रद्द करून न्याय द्यावा अशी गळ घातली. शेतीला पूरक प्रक्रिया उद्योगावर भर द्यावा. ज्येष्ठ नागरिकांसंदर्भात मदतीसाठी शासनाने योजना राबवाव्या, शेतीमाल खरेदी केंद्रांची उपलब्धता, कर्जमाफी अशा अनेक मागण्या व त्या संदर्भात निवेदन देण्यात आली.

यावेळी उपस्थितांना मागदर्शन करतांना सुरवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी कृषिमंत्री पद देऊन राज्याची सेवा करण्याची संधी निर्माण करून दिल्याबद्दल त्यांचे सर्वांच्यावतीने आभार मानले. आणि माझा पहिला नागरी सत्कार येवला लासलगाव मतदार संघात होतो आहे त्यामुळे मला अत्यंत आनंद होत आहे असे त्यांनी सांगितले. राजकारण एका बाजूला आणि लासलगावशी असलेले नाते एका बाजूला आहे. तसेच स्वर्गीय सीताराम आप्पा होळकर आणि स्वर्गीय कुसुमताई होळकर यांची आठवण काढत त्यांच्या समवेत राजकीय क्षेत्रात विविध संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळाली, दोघेही मला राजकारणात ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून लाभले.

          शेतकऱ्यांवर नेहमीच कोणती ना कोणती आपत्ती येत असते त्यातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारकडून अपेक्षा असते. त्यामुळे शेतकरी बांधवांना वेळोवेळी निर्माण होणाऱ्या समस्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहील. शेतकरी हा राज्याचा नव्हे तर देशाचा कणा आहे. अजून कार्यभार स्वीकारलेला नाही, कोणत्याही अधिकारी वर्ग सोबत माझी अजून भेट नाही. त्यामुळे लवकरच कार्यभार स्वीकारून कामकाजला सुरवात करणार आहे. तसेच कामकाज करत असतांना शेतकरी केंद्रबिंदू मानून काम करेल. केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल. केंद्र सरकारमध्ये धोरणात्मक निर्णय कसा घेता येईल प्रक्रिया क्षेत्रामध्ये प्रगती कशी करता येईल यासाठी यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. तुमचा मंत्री हा तुमच्या घरातला मंत्री आहे, कुणालाही राजकीय अडचण येऊ देणार नाही. सर्वांना सारखा न्याय देण्यासाठी मी खंबीर असून, जात,धर्म आणि पक्ष हा विचार माझ्या मनात कधीच नसतो. पारदर्शीपणे काम करायला मला आवडते.

        मी शेतकरी आहे. मी शेतात काम केले आहे. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतात काम करतांना येणाऱ्या अडचणी जाणीव आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेती करतांना येणाऱ्या अडचणीची जाणीव आहे. दरवर्षी येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणीमुळे होणाऱ्या नुकसानीची माहिती आहे. यातून शेतकऱ्यांना कसे वाचवायचे यासाठी प्रयत्न करेल. महाराष्ट्र सरकारने मला ही दिलेली जबाबदारी मोठी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कोणतीही समस्या आली तर तिला न्याय देणार, तसेच आलेल्या समस्या सोडविण्यासाठी मी तत्पर असेल. असे आवाहन ना. कोकाटे यांनी यावेळी केले.

 लासलगावशी सलोख्याचे व प्रेमाचे संबंध*

 राजकीय पक्ष,राजकीय विचार, राजकीय मत मतांतरे काहीही असो परंतु वैयक्तिक संबंध व प्रेम हे राजकारणा पलीकडची बाब आहे.राजकारण एका बाजूला आणि लासलगावशी असलेले संबंध एका बाजूला आहेत. मी पण एका शेतकरी कुटुंबातूनच आहे. त्यामुळे शेतीमाल विक्रीसाठी लासलगाव बाजार समितीलाच येत होता त्यामुळे लासलगावसोबत असलेले ऋणानुबंध पहिल्यापासूनच आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 5 7 0 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे