आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनशैक्षणिक
जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींचा कराटे स्पर्धेत तालुकास्तरावर दमदार विजय
0
4
2
9
5
7
सटाणा (ता. बागलाण) –
सटाणा येथील जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी अलीकडेच पार पडलेल्या तालुकास्तरिय कराटे स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत जिल्हास्तरावर आपली निवड सुनिश्चित केली आहे. कुमारी रेवती मोरे, आराध्या पाकळे आणि जानवी रौंदळ या तिघींनी जबरदस्त खेळ कौशल्य दाखवत प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत बागलाण तालुक्यातील विविध शाळांमधून अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. अत्यंत चुरशीच्या लढतीत जिजामाता विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी तंत्रशुद्ध खेळ, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले.
या यशामागे क्रीडा शिक्षक श्री. विजय सूर्यवंशी व श्री. सचिन कापडणीस यांचे कसून मार्गदर्शन लाभले. नियमित सराव, योग्य प्रशिक्षण आणि विद्यार्थिनींच्या कठोर परिश्रमामुळे हे यश शक्य झाले, असे मत विद्यार्थिनींनी व्यक्त केले.
स्पर्धेनंतर विद्यालयात खेळाडू विद्यार्थिनींचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्राचार्या श्रीमती जे. बी. देवरे, उपप्राचार्य श्री. आर. एच. देसले, पर्यवेक्षक श्री. डी. डी. पवार, श्री. के. पी. मोरे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विद्यालय प्रशासनाने विद्यार्थिनींच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
0
4
2
9
5
7



