Breaking
ब्रेकिंग

जागतिक किडनी दिनानिमित्त किम्स मानवता हॉस्पिटलचा अभिनव उपक्रम

डायलिसिस रुग्णांसाठी ‘आरोग्यदायी सहल’

0 4 6 1 9 7

डायलिसिस रुग्णांसाठी ‘आरोग्यदायी सहल’

जागतिक किडनी दिनानिमित्त किम्स मानवता हॉस्पिटलचा अभिनव उपक्रम

नाशिक : जागतिक किडनी दिनाच्या निमित्ताने किम्स मानवता हॉस्पिटल , नाशिक यांच्या नेफ्रॉलॉजी विभागातर्फे डायलिसिस रुग्णांसाठी विशेष ‘आरोग्यदायी सहल’ आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमांतर्गत डायलिसिस रुग्णांनी धम्मगिरी इंटरनॅशनल इन्स्टट्यूट इगतपुरी येथे भेट देत ध्यान, शांतता आणि सकारात्मक वातावरणाचा अनुभव घेतला.

या सहलीचा मुख्य उद्देश डायलिसिस रुग्णांचे मानसिक आरोग्य बळकट करणे, तणाव कमी करणे आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश देणे हा होता. दीर्घकाळ चालणाऱ्या उपचारांमुळे अनेक रुग्ण मानसिक थकवा अनुभवतात. अशा वेळी निसर्गरम्य आणि शांत वातावरणात घालवलेला वेळ त्यांना नवचैतन्य देणारा ठरतो.

या उपक्रमाचे मार्गदर्शन नेफ्रॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. मोहन पटेल यांनी केले. रुग्णांसोबत हॉस्पिटलचे डॉक्टर, नर्सिंग स्टाफ आणि समन्वयक उपस्थित होते.

 “डायलिसिस रुग्णांसाठी केवळ उपचार नव्हे, तर मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा देखील तितकीच महत्त्वाची आहे. अशा उपक्रमांमुळे रुग्णांमध्ये नवीन उत्साह निर्माण होतो आणि उपचार प्रक्रियेतही सकारात्मक परिणाम दिसून येतात.”

डॉ. मोहन पटेल,

Head – Nephrology & Kidney Transplant

किम्स मानवता हॉस्पिटल , नाशिक

या सहलीदरम्यान रुग्णांना ध्यान-धारणा केंद्राची माहिती देण्यात आली तसेच शांत आणि सकारात्मक वातावरणाचा अनुभव घेण्याची संधी मिळाली. रुग्णांनी या उपक्रमाचे स्वागत करत अशा कार्यक्रमांमुळे मानसिक समाधान, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा मिळते, असे किम्स मानवता हॉस्पिटल चे सीओओ डॉ निलेश सिंग यांनी सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 1 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे