आरोग्य व शिक्षणब्रेकिंगशैक्षणिकसत्कार
एक्झॉटिक कंपनीकडून विंचूर विद्यालयाला वॉटर कूलर भेट
0
4
2
9
5
7
आज कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय विंचूर येथे एक्झॉटिक फ्रुट प्रायव्हेट लिमिटेड मल्टिनॅशनल कंपनी यांच्याकडून जनरल मॅनेजर पुरुषोत्तम बाहेती यांच्या हस्ते प्रति 150 लिटर क्षमतेचे दोन वॉटर कूलर विद्यालयाला भेट दिले.
सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीला कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन केले गेले. त्याआधी मान्यवरांच्या हस्ते विद्यालयात वृक्षारोपण करत सहकार्याचे झाड लावण्यात आले. त्यानंतर लाईफ मेंबर आर. के. चांदे यांनी प्रास्ताविक सादर करताना विद्यालयातील विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची गरज असल्याचे सांगतानाच एक्झॉटिक कंपनीने केलेल्या सहकार्याची माहिती दिली. त्यानंतर कंपनीचे HR दीपक शिंदे यांनी एक्झॉटिक कंपनी विषयी व कंपनीच्या सामाजिक कार्याविषयीही माहिती दिली. तसेच पुढेही सामाजिक कामात कंपनी सहकार्य करेल असे आश्वासन देत विद्यालयाला अजून दोन वॉटर कुलर सोबतच वॉटर फिल्टर चे एक युनिट देण्याचे आश्वासन दिले.

ज्यांच्या माध्यमातून वॉटर कुलर प्राप्त झाले ते विद्यालयाचे माजी विद्यार्थी व उद्योजक अमोल दरेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी वेळोवेळी शाळेला सहकार्य केलेले आहे. आपल्या अध्यक्षीय मनोगत प्राचार्य देवढे एन. ई. यांनी कंपनीने केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करत असे सहकार्य पुढेही करावे. असे आवाहन केले. सदर कार्यक्रमास सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायकवाड एस. पी. व आभार प्रदर्शन टिळेकर आर. टी. यांनी केले.
0
4
2
9
5
7


