
0
2
5
6
2
9
आझाद हिंद फेस्टिव्हल – वार्षिक स्नेहसंमेलन व विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न
वाहेगाव साळ – श्री नेताजी सुभाषचंद्र बोस गुरुकुल येथे आझाद हिंद फेस्टिव्हल अंतर्गत वार्षिक स्नेहसंमेलन व विद्यार्थी गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली,
यावेळी प्रमुख मान्यवर अनिलजी काळे (माजी सभापती, चांदवड) आणि संजयजी जाधव (सभापती कृषि उत्पन्न बाजार समिती चांदवड) हे होते. विशेष अतिथी म्हणून कु. सई मोरांनकर यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला आणि त्यांच्या शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आणि सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
0
2
5
6
2
9