Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरब्रेकिंग

*उच्च रक्तदाब आणि किडनी : दुर्लक्षित होणारा संबंध* 

0 4 2 9 5 7

*उच्च रक्तदाब आणि किडनी : दुर्लक्षित होणारा संबंध* 

 *डॉ.इरावती वाघमारे (किडनी विकार तज्ञ MBBS. MD.(MEDICINE)* 

डॉ सांगतात उच्च रक्तदाब म्हणजे सिस्टोलिक (ज्याला सामान्य भाषेत ‘वरचं बीपी’ म्हंटले जाते) रक्तदाब 140 पेक्षा जास्त, आणि डायस्टोलिक (खालचं बीपी) 90 पेक्षा जास्त – पूर्वी केवळ वयोवृद्धांचा रोग मानला जात असे. मात्र आजच्या काळात हे चित्र वेगळे आहे.

**हा छुपा घातकी (silent killer) आज अनेक तरुणांनाही ग्रासतो आहे**. यामागची कारणे म्हणजे चुकीचे खाणे, अपुरी झोप, ताणतणाव, आणि अस्वस्थ जीवनशैली. पण अनेक वेळा उच्च रक्तदाबाचे मूळ कारण **किडनीचा एखादा आजार** देखील असू शकते.

**किडनी आणि उच्च रक्तदाब यांचे नाते दुतर्फी आहे.** उच्च रक्तदाबामुळे किडनीचे नुकसान होऊ शकते, आणि बऱ्याच वेळा किडनीच्या आजाराचे लक्षण म्हणूनही उच्च रक्तदाब दिसून येतो. बहुतेक वेळा कोणतेही दिसून येणारे, स्पष्ट असे लक्षण नसते, त्यामुळे तपासण्या करणे आवश्यक ठरते. या तीन सोप्या तपासण्या उपयुक्त ठरतात:

1. लघवीची तपासणी (urine routine),

2. किडनी कार्य तपासण्यासाठी रक्ततपासणी (serum creatinine),

3. किडनी व त्यांच्या रक्तवाहिन्यांचे अल्ट्रासाऊंड (ultrasound with doppler scan).

कधी कधी फक्त रक्तातील क्रिएटिनिन तपासले जाते आणि त्यावरून किडनी ठिक आहे असा गैरसमज होतो. 

**पण लघवीतील प्रथिनांची तपासणी (proteinuria) अनेक वेळा खरी माहिती देते**, आणि त्यातून किडनीच्या आजाराचं निदान करता येते. त्याचप्रमाणे **किडनीच्या रक्तवाहिन्यांचे आकुंचन (renal artery stenosis)** झाल्यानेही उच्च रक्तदाब निर्माण होतो, आणि काही वेळा त्या आकुंचनाचे निदान व उपचार केल्यानेच बीपी नियंत्रणात येऊ शकते. योग्य वेळी निदान झाल्यास कायमस्वरूपी किडनीचे होणारे नुकसान टाळता येऊ शकते.

**उच्च रक्तदाब किडनीचे हळुहळू नुकसान करत राहतो.** त्यामुळे किडनीची अकार्यक्षमतेच्या (end-stage kidney disease) दिशेने वाटचाल सुरू होते, ज्यामुळे प्रसंगी **डायलिसिसची गरज** भासू शकते. त्यामुळे ***रक्तदाब नियंत्रणात ठेवणे हे किडनी वाचवण्याचे महत्वाचे साधन आहे**.

तरुणांमध्ये हा आजार झपाट्याने वाढतो आहे. त्यामुळे **बीपी तपासण्याकडे किंवा नियमित आरोग्य तपासणीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका**, विशेषतः किडनीच्या आरोग्याची चाचणीही यात समाविष्ट असावी. **उच्च रक्तदाब फक्त हृदयावर नव्हे, तर फुफ्फुसे, मेंदू, डोळे आणि किडनीवरही परिणाम करतो**. जर तुम्हाला उच्च रक्तदाब म्हणजे हाय बीपी असेल, तर **नियमित औषधे घेणे, निरोगी जीवनशैली, आणि रक्तदाबावर लक्ष ठेवणे** हे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

 *अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल* , नाशिक हे उत्तर महाराष्ट्रातील एक आघाडीचे रुग्णालय आहे, जे डायलिसिस रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा आणि मूत्रपिंड प्रत्यारोपण केंद्र म्हणून ओळखले जाते. मूत्रपिंड प्रत्यारोपणा साठी आवश्यक सर्व डॉक्टर येथे एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे