0
4
2
9
5
7
*शिक्षण क्षेत्रातील महामेरु…पी.एस निकाळे सर*
शिक्षण करुन नोकरी करुन अनेक जण आपला उदरनिर्वाहापुरतंच जगतात परंतु नोकरीत असतांनाही आपले सामाजिक योगदान समाजासाठी देण्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्यांपैकी आदर्श व्यक्तीमत्व हे तितकंच उच्च दर्जाच्या विचारांनी भरलेलं ग्रंथालय असतं…अशी माणसं आपल्या कार्यातुन समाजजिवनात आदर्श ठरतात..त्यापैकीच एख म्हणजे आदर्श मुख्याध्यापक म्हणून संस्थेत सर्वांना परिचित असणारे.महामेरु म्हणजे प्रल्हादजी निकाळे सर होय.

मरावे परी किर्तीरुपी उरावे…ह्या उक्तीशी सुसंगतपणे आपल्या आयुष्यातील वाटचाल करणारे.आपल्या खडतर जिवनातुन शिक्षणाचे महत्त्व ओळखुन कुटुंबास तसेच जवळ असणाऱ्या प्रत्येकास प्रगतीचा मार्ग दाखवणारे..निकाळे सर..ह्यांनी आपल्या सत्कार्याचा ठसा नेहमीच समाजमनावर उमटवला..गरीबीत जन्म घेतल्याने गरीबीला दोष न देता शिक्षणाची कास धरुन आपल्या जिवनाचा पाया त्यांनी मजबुत केला.आई वडील काबाडकष्ट उपसत असतांना त्यांना गरीबीचे चटके सहन झाले नाही .तेथेही ते मदत करत राहिले …परंतु अशीच मजुरी करत राहिल्याने आयुष्यात कुठलाही बदल घडणार नाही …म्हणून शिक्षण हे महत्त्वाचे आहे असे त्यांचे ठाम मत राहिले.कुटुंबातील हा गरिबीचा अंधार दुर करण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही शिक्षणानेच हा अंधार दुर होऊन उजेडाची वाट दिसेल..अशी मनाशी जिद्द ठेऊन त्यांनी पुढील वाटचाल चालु ठेवली.अनेक अडीअडचणींना तोंड देत त्यांनी आपले शिक्षण पुर्ण केले .त्यांचे प्राथमिक तसेच महाविद्यालयीन शिक्षण निफाड तालुक्यातील वनसगांव येथे झाले.आजपर्यंत मुख्याध्यापक पदावर असतांना पदाचा कुठलाही अहंकार न बाळगता शिक्षण क्षेञातील सेवा उत्तमपणे केली .शिक्षक असेल विद्यार्थी असेल किंवा इतर कर्मचारी ..ह्यांच्या कडुन हसत खेळत कार्य करुन घेण्याची एक अनोखी कार्यकुशलता त्यांच्यामध्ये प्रभावीपणे होती.आपली कर्तव्यनिष्ठा तसेच सामाजिक बांधिलकी जोपासतांना..सरांनी प्रामाणिकपणे आपले प्रयत्न करत राहीले.वनसगांव येथील राजकीय,सामाजिक क्षेञातील तसेच शिक्षक तसेच इतर कर्मचारी तसेच नागरिक ह्यांचे सर्वांचे सहकार्य नेहमीच असायचे.आपल्या हातुन नेहमीच दुसऱ्याचे भले झाले पाहिजे तसेच एक शिक्षक हा उद्याच्या पिढीतील सुजान,नितीवान..तसेच देशाप्रती समर्पण आणि आस्था आसणारे नागरिक घडवण्याचे महत्तम कार्य करत असतो.आपल्या कुटुंबात आणि समाजात शिक्षणाची बिजं पेरतांना..शिक्षक हा खुप महत्त्वाची भुमिका बजावतो.मुलांना योग्य ते संस्कार योग्य वयात रुजवण्यासाठी नेहमीच अग्रभागी व तत्पर असणाऱ्यांपैकी निकाळे सर हे एक आगळेवेगळे व्यक्तीमत्व ..आपल्या आयुष्यात अनेक डाॕक्टर,इंजिनियर ,शिक्षक ,आधिकारी तसेच आदर्श नागरिक घडविणारे त्याचबरोबर कुटुंबालाही योग्य संस्कार देऊन उच्च ठिकाणावर पोहचवणारा..आणि समाजासाठी वेळोवेळी दान आणि समर्पण देणारा हा शिक्षण क्षेत्रातील महामेरु….दिनांक २०/७/२०२१ रोजी तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.आजरोजी त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या पविञ स्मृतीस विनम्र अभिवादन..!
शब्दांकन -राहुल सोनवने पोलीस पाटील धारणगांव
0
4
2
9
5
7