Breaking
अपघात

उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना ; भोले बाबा यांच्या सत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरी

100 हून अधिक भाविक मृत्यूमुखी

0 1 5 1 2 2

उत्तर प्रदेश राज्यातील हाथरस जिल्ह्यातील सिकंदरा राऊ  जवळच्या मुगलगढी  गावात आयोजित भोले बाबा यांच्या सत्संग कार्यक्रमास जमलेल्या भक्तांमध्ये चेंगराचेंगरी होऊन शंभरहून अधिक भाविक मृत्युमुखी पडल्याची दुर्घटना आज मंगळवारी घडली आहे.

 भोले बाबा यांचा सत्संग संपल्यानंतर भाविकांनी घरी जाण्यासाठी एकच गर्दी केली त्यामुळे त्यांच्यात चेंगरा चेंगरी होऊन सुमारे 100 हून अधिक भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर तर अनेक जखमी भाविकांना एटा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये पुरुष महिला तसेच लहान मुले देखील आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. तसचं मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची आणि जखमींना रु. 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
एक्स (ट्विटर) या सोशल मीडिया व्यासपीठावर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयानं हाथरसमध्ये झालेल्या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत.
हेल्पलाईन
05722227041 /
05722227042
साकार हरी बाबा –
सुटा बुटात राहणाऱ्या हरी बाबा उर्फ भोले बाबा चे खरे नाव सुरज पाल आहे.17 वर्षांपूर्वी पोलीस कॉन्स्टेबल च्या नोकरीत होते. नोकरी सोडून ते सत्संग करायला लागले. नोकरी सोडल्यावर सुरज पाल नाव बदलून साकार हरी बाबा नाव धारण केले. बाबा सर्वसामान्य साधू प्रमाणे भगवे वस्र धारण न करता शर्ट पॅन्ट महागडे गॉगल वापरतात. त्यांच्या राहणीमानमुळे मोठया प्रमाणात शिष्य आहेत. हे शिष्य त्यांना भोले बाबा म्हणून संबोधतात.
उत्तर प्रदेश शिवाय राजस्थान मध्येही त्यांचे शिष्य मोठ्या प्रमाणावर आहे.
साकार हरी बाबा आपल्या सत्संगातून मानव सेवेचा संदेश देतात. मानव सेवा सर्वात मोठी सेवा असल्याचे ते सांगतात. सत्संगात येणाऱ्या  लोकांचे रोग दूर होतात, मन शुद्ध होते, इथे कोणताही भेदभाव नाही, कोणतेही दान नाही, कोणतेही पाखंड नाही इथे सर्व समभाव आहे ब्रह्मलोक आहे इथेच स्वर्ग आहे असेही ते सांगतात. इतर साधुसंतांपेक्षा त्यांचे वेगळेपण दिसून येते.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 5 1 2 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे