ब्रेकिंग
*अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका पाच दिवस नाशिकमध्ये

0
4
6
8
5
8
*अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका पाच दिवस नाशिकमध्ये
*दि.३० मे ते ३ जून पर्यंत अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका नाशिकमध्ये*
*नाशिक,दि.२५ मे:-* श्री स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ पालखी आणि पादुका परिक्रमणा वर्ष २९ निमित्त शनिवार दि. ३० मे ते ३ जून २०२६ या कालावधीत नाशिक शहरातील विविध भागात भरगच्च धार्मिक कार्यक्रम, दर्शन सोहळे तसेच प्रचार-प्रसार उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर रविवार दि. २४ मे रोजी तिडके कॉलनी येथील ऋग्वेद हॉलमध्ये नियोजन सभा उत्साहात संपन्न झाली. यावेळी विश्वस्त शामशेठ तांबोळी, विश्वस्त जगदीशअण्णा पाटील, खजिनदार संदीप खैरनार तसेच सहखजिनदार केदार कुलकर्णी उपस्थित होते.
सभेमध्ये अक्कलकोटवरून येणाऱ्या वारकरी संप्रदायातील भाविकांची वैद्यकीय तपासणी व आरोग्यसेवा यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली. वैद्यकीय उपचार समितीत डॉ. प्रवीण कोडीलकर, डॉ. दीप्ती कुलकर्णी, डॉ. श्रीपाद उपासनी, डॉ. रघुनंदन शुक्ल आणि डॉ. देवेन पाठक यांची निवड करण्यात आली.
महाप्रसाद भंडारा समितीत विशाल तांबोळी, बाळू बत्तासे, मंदार तगारे, बळीराम चांडोले, राहुल जगताप, आनंद पाटील, सागर तांबोळी, रंगा दंडगव्हाळ आणि मिलिंद खाडे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच मिरवणूक स्वयंसेवक म्हणून प्रशांत गाडगीळ, जयेश आमले, युवराज पाटील, अभिजीत तांबोळी, सिद्धेश खैरनार, नंदकुमार पतंगे, प्रवीण मुनोत, श्रीकांत भामरे, कृष्णा देवरे, प्रमोद जोशी आणि ओमकार खाडे आदींची निवड करण्यात आली.
या सभेस नाशिक शहरातील विविध भागातील स्वामीभक्त सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये भाऊमहाराज खैरनार, संतोष पोळ गुरुजी, दशरथ खेडकर, स्वरूपा खेडकर, पुरुषोत्तम कुलकर्णी, प्रशांत दिवटे, भारती कुक्कर, अश्विनी आमले, वंदना जोशी, मनीषा कासार, स्वाती गुंडाळे, श्रद्धा सोनवणे, वर्षा गायधनी, उत्तरा गायधनी, स्वाती पाठक, प्रशांत शिंदे, सुवर्णा चित्तेवार, संगीता माळवतकर, राजेश शिंगणे, अमित भालेराव, लक्ष्मण आहेर, मोहनिष गायधनी आदी उपस्थित होते.
या पाच दिवसीय परिक्रमेदरम्यान नाशिककर स्वामीभक्तांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्याची संधी उपलब्ध होणार असून शहरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.
0
4
6
8
5
8


